• Download App
    13 लोक जिवंत जाळलेल्या बंगालच्या रामपुरहाट मध्ये भयाचे वातावरण!!; तृणमूलच्या नेत्यांचा गुन्हेगारांना आश्रय!! Bengal Jihadi Terrorism 3 people burnt alive Bengal

    Bengal Jihadi Terrorism : 13 लोक जिवंत जाळलेल्या बंगालच्या रामपुरहाट मध्ये भयाचे वातावरण!!; तृणमूलच्या नेत्यांचा गुन्हेगारांना आश्रय!!

    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये जिहादी हिंसाचाराच्या थैमानात 13 लोक जिवंत जाळलेल्या रामपुरहाट गावात अतिशय भयाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. पश्चिम बंगाल सरकारच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आज रामपुरहाट गावाला भेट दिली तेव्हा गावातील भयानक परिस्थितीची त्यांना जाणीव झाली. Bengal Jihadi Terrorism 3 people burnt alive Bengal

    रामपुरहाट गावामध्ये भयाचे वातावरण असल्याने कोणीही बोलायला तयार नाही. त्याचबरोबर अजूनही जिहादी दहशतवादी गावात आणि आसपासच्या गावांमध्ये लपून बसल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारच्या पोलिसांनी काही ठिकाणी छापेमारी केली आहे. परंतु त्यांच्या हाती फारसे काही लागल्याचे दिसत नाही.

    – शुभेंदू अधिकारींची भेट

    विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी आणि खासदार अर्जुन सिंग, खासदार जगन्नाथ सरकार रामपुरहाट गावाला भेट दिल्यावर काही लोक त्यांना भेटायला आले. परंतु पोलिसांनी त्यांना आडकाठी केली होती. शुभेंदू अधिकारी यांनी पोलिसांशी हुज्जत घातल्यानंतर लोकांना त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली.

    – घरे भस्मसात

    प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन भेट दिल्यानंतर तेथील परिस्थिती किती भयानक आहे हे त्यांनी पाहिले रामपुरहाट मधील घरे जळून भस्मसात झाली आहेत. आसपास या घरांमधून लोकांनी पलायन केले आहे. अशा स्थितीत प्रत्यक्षदर्शी कोणत्या स्वरूपाने बोलतील आणि बोलायला तरी कसे पुढे येतील?, असा सवाल अधिकारी यांनी केला आहे.

    हायकोर्टाचे निर्देश

    कोलकता हायकोर्टाने घटनास्थळाची संपुर्ण निगराणी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कडे सोपवली आहे. तसेच घटनास्थळाचा आसपास सीसीटीव्ही कॅमेरे बसवून तेथील पुराव्यांची कोणती छेडछाड होता कामा नये, असे राज्य सरकारला बजावले आहे. परंतु गावातील वातावरण एवढे भयावह आहे की कोणी प्रत्यक्षदर्शी आता बोलायला कसा आणि केव्हा पुढे येतो?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    येत्या 24 तासांमध्ये राज्य सरकारला कोलकत्ता हायकोर्टामध्ये संबंधित केसची पोलीस डायरी सादर करण्याचे आदेश आहेत परंतु या पोलिस डायरीत नेमका कशाचा नोंदी असतील याविषयी शंका व्यक्त करण्यात येत आहे. ममता बॅनर्जी यांचे सरकार गुन्हेगारांना वाचवत असल्याचा आरोप खासदार अर्जुन सिंग आणि खासदार जगन्नाथ सरकार यांनी केला आहे. जळीतकांडतले गुन्हेगार आसपासच्या गावांमध्ये लपले आहेत. त्यांना तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी आश्रय दिला आहे, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

    Bengal Jihadi Terrorism 3 people burnt alive Bengal

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!