विशेष प्रतिनिधी
कोलकता : मुर्शिदाबाद मधल्या दंगल पीडित महिलांच्या संरक्षणाची, त्यांचा आत्मसन्मान राखण्याची जबाबदारी पश्चिम बंगाल सरकारची आहे. त्यात त्यांनी राजकारण आणून कुचराई करू नये, अशा परखड शब्दांत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी पश्चिम बंगाल सरकारला सुनावले. Murshidabad
Waqf सुधारणा कायद्याला विरोध करण्याच्या नावाखाली धर्मांध मुस्लिमांनी पश्चिम बंगाल मधल्या मुर्शिदाबाद, जंगीपूर, मालदा इथे दंगल घडवली तिसऱ्या हिंदूंची घरेदारे, वाहने दुकाने जाळून टाकली. सुमारे 1000 हिंदू कुटुंबीयांना घरदार सोडून पश्चिम बंगाल आणि राज्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला. धर्मांध मुस्लिम समाजकंटकांनी महिलांवर हात टाकले. लहान मुलांनाही सोडले नाही. पूर्ण देशभरातून पश्चिम बंगाल मधल्या दंगलीचा निषेध झाला, तरी बंगाल सरकार मात्र ढिम्म राहिले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुर्शिदाबाद किंवा मालदा इथे फिरकल्या देखील नाहीत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजयाताई रहाटकर आणि त्यांच्या सहकारी मुर्शिदाबाद मालदा इथला दौरा करून आल्या. तिथल्या महिलांशी फक्त बोलून त्यांनी त्यांचे दुःख आणि वेदना समजावून घेतले. मालदा मधल्या शरणार्थी शिबिरात सुमारे 700 ते 800 हिंदू कुटुंबांनी आश्रय घेतलाय. त्या शिबिराला विजयाताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट दिली. त्यानंतर मुर्शिदाबाद मध्ये प्रत्यक्ष दंगलग्रस्त भागाला भेट देऊन तिथल्या महिलांशी संवाद साधला. त्यावेळी तिथल्या महिलांनी प्रचंड आक्रोश केला. समाजकंटक आमची घरेदारे जाळत होते. आम्हाला खेचून बाहेर काढत होते. तरुण मुलींवर हात टाकत होते, त्यावेळी आमच्या मदतीला कोणीही आले नाही, अशा संतप्त भावना तिथल्या महिलांनी व्यक्त केल्या. Murshidabad
– दंगली वरून राजकारण नको
सर्व घटनाक्रमाची कहाणी विजयाताई रहाटकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितली. मुर्शिदाबाद मधल्या दंगल पीडित महिलांच्या संरक्षणाची, त्यांचा आत्मसन्मान जपण्याची जबाबदारी पश्चिम बंगाल सरकारची आहे. त्यांनी ती पार पाडली पाहिजे. दंगलीच्या मुद्द्यावरून कुठलेही राजकारण करण्याची गरज नाही. असले राजकारण करायला मी इथे आले नाही. मी या दंगल पीडित महिलांच्या वेदनांवर फुंकर घालायला आली आहे. त्यांचे मनोधैर्य टिकवायला आली आहे, असे विजयाताई म्हणाल्या.
– दंगल पीडित महिलांचे दुःख
कुठेही दंगल झाली की त्याचा पहिला बळी महिला आणि लहान मुले ठरतात. तेच मुर्शिदाबाद मध्ये घडले. त्यामुळे खरं म्हणजे राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी तिथे ताबडतोब येऊन त्या महिलांचे दुःख समजून घेऊन त्यांना मदत करायला हवी होती. पण तसे घडलेले दिसले नाही. शेकडो घरेदारे जळाली. गुंडांनी तरुण मुलींना घरांमधून बाहेर खेचून काढले. त्यांच्यावर लग्नाची सक्ती केली. हे दुःख आणि वेदना पश्चिम बंगाल सरकारने समजून घ्यायला हवी होती. दंगलीच्या मुद्द्यावर राजकारण करण्यापेक्षा महिलांचा आत्मसन्मान टिकवण्याचे कायमचे उपाय करायला हवे होते, अशा परखड शब्दांमध्ये विजयाताईंनी पश्चिम बंगाल सरकारचे वाभाडे काढले.
– महिला आयोगाच्या अहवाल लवकरच
राष्ट्रीय महिला आयोग मुर्शिदाबाद मधल्या सगळ्या घटनांबद्दल आणि दंगल पीडित महिलांच्या वेदनांविषयी, त्यांच्या गरजांविषयी एक सविस्तर अहवाल तयार करेल. तो पश्चिम बंगाल सरकार, पश्चिम बंगालच्या महिला आयोग आणि केंद्र सरकारला पाठवले. त्यावर सरकारने अंमलबजावणी करायचा आग्रह धरेल, असेही विजयाताई रहाटकर यांनी स्पष्ट केले.
Bengal government’s responsibility to protect women victims of riots in Murshidabad
महत्वाच्या बातम्या
- Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार
- Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या
- Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी
- UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही