• Download App
    बंगालमध्ये मणिपूर सारखीच घटना, महिला उमेदवाराची निर्वस्त्र धिंड; पण ममतांच्या पोलिसांचे हात वर!!|Bengal as in Manipur, woman candidate strip naked; But Mamata's police hands up!!

    बंगालमध्ये मणिपूर सारखीच घटना, महिला उमेदवाराची निर्वस्त्र धिंड; पण ममतांच्या पोलिसांचे हात वर!!

    वृत्तसंस्था

    कोलकाता : हिंसाचारग्रस्त मणिपूर मध्ये दोन महिलांची निर्वस्त्र झेंड काढल्यायाच्या मुद्द्यावरून देशात प्रचंड संताप उसळला असताना त्यावर राजकारण सुरूच आहे. पण तशीच एक घटना पश्चिम बंगाल मधून समोर आल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पोलिस मात्र त्या विषयावर हात वर करून मोकळे झाले आहेत.Bengal as in Manipur, woman candidate strip naked; But Mamata’s police hands up!!

    मणिपूरमध्ये दोन महिलांची निर्वस्त्र करून धिंड काढली. ही घटना मे महिन्यात घडली होती. त्याचा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला आणि देशभर समता उसळला विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरले. संसदेचे कामकाज चालू दिले नाही. मणिपूर सरकार बरखास्तची मागणी केली.



    मणिपूर वरून देशभर संताप आणि विरोधकांचे राजकारण सुरू असताना पश्चिम बंगाल मधून तशीच घटना समोर आली आहे. हावडा पासून जवळ असलेल्या पांचला पंचायत निवडणुकीत एक महिला भाजपच्या तिकिटावर उभी राहू इच्छित होती. परंतु, तिला प्रतिबंध करण्यासाठी तृणमूळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या कुटुंबावर दबाव आणला. इतकेच नाहीतर त्या महिलेची वस्त्रे फाडली. आणि तिची गाढवावरून निर्वस्त्र धिंड काढली. याचा व्हिडिओ सरकारने काढू दिला नाही. इतकेच नाही तर, ही घटना दडपण्याचे प्रयत्न झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मुजुमदार आणि खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेवर प्रकाश टाकला आणि कारवाईची मागणी केली.

    त्यानंतर पश्चिम बंगाल पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन तशी कोणती घटना घडलीच नसल्याचा दावा करत हात वर करून टाकले. 13 जुलैला भाजपकडून ईमेलद्वारे एक तक्रार आली होती. 8 जुलै रोजी सकाळी 11.00 वाजता पांचला ठाण्याच्या क्षेत्रात एका महिलेला बूथ मधून जबरदस्तीने बाहेर काढले. तिची छेड काढली आणि कपडे फाडले यासंदर्भात 14 जुलैला एफआयआर दाखल झाली. पण त्याची चौकशी आणि तपास केल्यावर कशी कोणतीही घटना घडली नसल्याचे आढळून आले, अशी माहिती पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक मनोज मालवीय यांनी दिली.

    यातली विसंगती अशी की, जोपर्यंत भाजपच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन पांचलाच्या घटनेवर प्रकाश टाकला नाही, तोपर्यंत पोलिसांनी या संदर्भात कोणतेही निवेदन केले नव्हते. पण सुकांत मुजुमदार आणि लॉकेट चटर्जी यांच्या पत्रकार परिषदेनंतर मात्र पोलीस महासंचालकांनी समोर येऊन अशी कोणती घटना घडली नसल्याचा दावा करून हात वर करून टाकले.

    Bengal as in Manipur, woman candidate strip naked; But Mamata’s police hands up!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!