• Download App
    प्रतिकूल परिस्थितीतही देशहिताचाच विचार मांडण्याचे अतुलनीय धैर्य सावरकरांनी दाखविले; अमित शहा यांचे गौरवोद्गार believe that nobody else had a sense of patriotism of the kind that Veer Savarkar had.Without changing his stand

    प्रतिकूल परिस्थितीतही देशहिताचाच विचार मांडण्याचे अतुलनीय धैर्य सावरकरांनी दाखविले; अमित शहा यांचे गौरवोद्गार

    वृत्तसंस्था

    अंदमान : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत असताना देखील देशाच्या हिताचा विचार मांडण्याचे अतुलनीय धैर्य स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दाखविले, असे गौरवोद्गार केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज काढले.believe that nobody else had a sense of patriotism of the kind that Veer Savarkar had.Without changing his stand

    गेले दोन दिवस अमित शहा हे अंदमान निकोबारच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज नेताजी सुभाष चंद्र बेटावर विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले. त्यावेळच्या कार्यक्रमांमध्ये अमित शहा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाष चंद्र बोस, सचिंद्रनाथ संन्याल अशा असंख्य क्रांतिकारकांना श्रद्धांजली अर्पण केली.

    स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी बोलताना अमित शहा म्हणाले, की या देशात अशी कोणतीही समस्या नव्हती की जिचा विचार सावरकरांनी आपल्या काळात केला नव्हता. सावरकरांनी देशाच्या संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाचा सखोल विचार केला होता. या देशावर स्वातंत्र्यानंतर जेवढी म्हणून परकीय संकटे आली त्या सर्वांचा इशारा त्यांनी आपल्या आधीच्या लेखनातून आणि भाषणातून दिला होता. त्या वेळेला अत्यंत प्रतिकुल राजकीय परिस्थितीला त्यांना तोंड द्यावे लागले. समाज विरोधात गेला होता. परंतु तो विरोध सहन करत आणि प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत त्यांनी समाज हिताचा आणि राष्ट्र हिताचाच विचार कायम मांडला. असे अतुलनीय धैर्य फार कमी लोकांमध्ये असते. ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दाखविले, असे गौरवोद्गार अमित शहा यांनी काढले.

    सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अतुलनीय योगदान होते. त्यांच्या सारख्या असंख्य स्वातंत्र्यवीरांचे कष्ट दुर्दैवाने विसरले गेले. त्यांना इतिहासाची जेवढे सन्माननीय स्थान द्यायला हवे होते तेवढे गेल्या साठ-सत्तर वर्षांत दिले गेले नाही. परंतु आता संपूर्ण देश स्वातंत्र्याचा केंद्र सरकारने सर्व स्वातंत्र्य सैनिकांचा यथोचित सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. अंदमान बेटावर बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे नाव आझाद हिंद फौज उड्डाणपूल असे ठेवण्यात आले आहे. अंदमान मधल्या एका द्वीपाचे नामकरण नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या नावाने करण्यात आले आहे, याकडे अमित शहा यांनी लक्ष वेधले

    केवळ एक – दोन परिवारांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले असा गैरसमज आत्तापर्यंत पसरवण्यात आला. परंतू असंख्य क्रांतीकारकांचे श्रम आणि बलिदान यातून देश स्वतंत्र झाला. इथून पुढच्या काळात सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका सहभाग या धोरणाने आपण पुढे गेले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

    believe that nobody else had a sense of patriotism of the kind that Veer Savarkar had.Without changing his stand

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य