वृत्तसंस्था
बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ३ सप्टेंबर रोजी मतदान झाले होते. सकाळी आठ वाजता या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिला निकाल काही वेळात जाहीर होणार आहे. दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे. Belgaum Municipal Corporation Election Results will declered Soon
निवडणुकीत प्रथमच भाजप आणि काँग्रेस हे आपल्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीने त्यांना तगडं आव्हान दिले आहे. निवडणुकीची मतमोजणी बीके मॉडेल हायस्कूल येथे सुरु आहे. एकूण ५८ जागांसाठी मतदान पार पडले आहे. एकूण ३८५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत अधिकृत २१ तर भाजप ५५ , काँग्रेस ४५ जेडीएस ११, आम आदमी ३७ , एआयएमआयएम ७, अन्य दोन आणि अपक्ष, अशा २१७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरेल. मतमोजणीसाठी केंद्रात ५०० पोलीस तैनात करण्यात आलेत. तर मतमोजणी केंद्राच्या आवारात कलम १४४ जारी केले आहे. शहरात १५०० पोलिसांची तैनाती केली आहे. मतमोजणी केंद्राच्या दिशेनं जाणारे सर्व रस्त्यांवर बॅरिकेड्स लावले आहेत. दुपारनंतर निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
Belgaum Municipal Corporation Election Results will declered Soon
महत्त्वाच्या बातम्या
- पंजशीर खोऱ्यात नॉर्दन अलायन्सकडून तालीबानला जबरदस्त दणका, ६०० तालीबानी ठार
- गांधी परिवारात प्रशांत किशोर यांच्या कॉँग्रेस प्रवेशाची चर्चा पण विरोध करत वरिष्ठ नेते म्हणतात ते तर फुस्स बॉँब
- छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे वडील म्हणतात ब्राम्हणांवर बहिष्कार टाका, पोलीसांनी दाखल केला गुन्हा
- South Africa Riots : दक्षिण आफ्रिकेत भारतवंशीयांकडून भयंकर हिंसाचार, डझनभर कृष्णवर्णीयांचा मृत्यू