• Download App
    आदिवासी असल्यानेच डॉ. भारती पवार यांना लोकसभेत बोलू दिले नाही, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांचा विरोधकांवर हल्लाबोल|Being a tribal, Dr. Bharti Pawar not allowed to speak in Lok Sabha, Union Health Minister Mansukh Mandvia attacks opposition

    आदिवासी असल्यानेच डॉ. भारती पवार यांना लोकसभेत बोलू दिले नाही, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांचा विरोधकांवर हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार या आदिवासी आहेत. त्यामुळेच विरोधक त्यांना लोकसभेत बोलू देत नाहीत असा आरोप आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी केला आहे.Being a tribal, Dr. Bharti Pawar not allowed to speak in Lok Sabha, Union Health Minister Mansukh Mandvia attacks opposition

    लोकसभेत डॉ. भारती पवार यांना बोलू देण्यात आले नाही. त्यांच्या बोलण्यात सतत अडथळे आणण्यात येत होते. त्यामुळे संतप्त झालेल्या मांडवीय यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधकांवर जातीयवादाचा आरोप करत त्यांनी केला.



    मांडवीय म्हणाले, डॉ.भारती पवार आदिवासी समाजातून आल्या आहेत. त्या एमबीबीएस पर्यंत शिकलेल्याआहेत. आज पहिल्यांदा त्या मंत्रीमंडळाच्या वतीने मंत्रालयाच्या वतीने उत्तर देत होत्या. पण विरोधी पक्षाला आदिवासी राज्यमंत्र्यांचे ऐकायचे नाही. ते एका आदिवासी महिलेचा अपमान करत आहेत,.

    आरोग्यमंत्र्यांनी विरोधकांना आपल्या वाग्बाणांनी घायळ केल्यावर डॉ. पवार यांनी भाजप नेते सुनील कुमार सिंह आणि रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी संस्थात्मक प्रसूतीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.त्या म्हणाल्या की, २०१४-१५ मध्ये मातृ मृत्यू दर दर दहा हजार प्रसुतींमागे १२२ होता. २०१९-२० मध्ये हा दर प्रति ११३ इतका आला आहे. प्रत्येक महिलेसाठी सुरक्षित बाळंतपण आणि मातृत्व सुनिश्चित करण्यासाठी सरकार कटिबध्द आहेत.

    मांडवीय यांच्या आरोपाला उत्तर देताना, काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा म्हणाले, हे सरकार देशाचे लक्ष विचलित करण्यासाठी, विभाजित करण्यासाठी आणि खऱ्या समस्यांपासून हटविण्यासाठी ध्रवीकरण करत आहे. नरेंद्र मोदी यांची भारताच्या इतिहासात सर्वात विभाजक नेते नोंद होईल. काँग्रेस नेते अखिलेश प्रताप सिंह म्हणाले की, आरोग्यमंत्र्यांचे वक्तव्य बेजबाबदार आहे. भाजपा महिलांशी कशी वागते हे सर्वांना माहित आहे, ते लपलेले नाही.

    Being a tribal, Dr. Bharti Pawar not allowed to speak in Lok Sabha, Union Health Minister Mansukh Mandvia attacks opposition

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज