• Download App
    जादूई फिरकी काळाच्या पडद्याआड; बिशनसिंग बेदी गेले!!|Behind the curtain of magical spinning time; Bishan Singh Bedi is gone!!

    जादूई फिरकी काळाच्या पडद्याआड; बिशनसिंग बेदी गेले!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : जादूई फिरकी काळाच्या पडद्याआड गेली. बिशनसिंग बेदी यांच्या निधनाने भारतीय गोलंदाजीचे एक महापर्व देखील संपले. नुकतीच 75 साजरी करणाऱ्या बिशनसिंग बेदींनी एक आपल्या फिरकीने भले भले फलंदाज तंबूत पाठवले. भारताचे त्यांनी नेतृत्व केले. विश्वचषकात भारताची दमदार घोडदौड सुरू असताना बिशनसिंग बेदी मनाला चटका लावून गेले.Behind the curtain of magical spinning time; Bishan Singh Bedi is gone!!

    1970 च्या दशकामध्ये आपल्या फिरकी गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या ग्रेट चौघांमध्ये बिशन सिंग बेदी यांचा समावेश होता. यात बिशन सिंग बेदींबरोबरच इरापल्ली प्रसन्ना, बी. एस. चंद्रशेखर आणि एस. वेंकटराघवन यांचाही या सर्वोत्तम 4 फिरकीपटूंमध्ये समावेश होता.



    बिशन सिंग बेदींचा जन्म 25 सप्टेंबर 1946 अमृतसरमध्ये झाला. ते डाव्या हाताने उत्तम फिरकी गोलंदाजी करायचे. भारतीय कसोटी क्रिकेट संघात बिशनसिंग बेदी 1966 ते 1979 दरम्यान खेळले. बिशनसिंग बेदींनी 22 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून भारताचं नेतृत्व केलं. त्यांनी 67 कसोटी सामन्यांमध्ये 266 विकेट्स घेतल्या. आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेट कार्किर्दीमध्ये त्यांनी 1560 विकेट्स घेतल्या. बिशन सिंग बेदी भारतासाठी 10 एकदिवसीय सामनेही खेळले. सुनील गावसकर त्यांना जगातला सर्वोत्तम डावखुरा गोलंदाज म्हणायचे.

    5 पैकी 2 कसोटी जिंकल्या

    1977-78 मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांमध्ये बेदींच्या नेतृत्वाखाली 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलिया कडवी झुंज दिली. ही मालिका बॉबी सिम्पसन यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने 3 – 2 च्या फरकाने जिंकली. या मालिकेमधील मेलबर्न आणि सिडनी कसोटी बेदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकत यजमान संघाला घाम फोडला होता. शेवटची आणि पाचवी निर्णायक कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकत मालिका 3 – 2 ने खिशात घातली होती.

    पहिला एकदिवसीय सामना जिंकून देण्यात मोलाची कामगिरी

    बिशनसिंग बेदी यांनी भारताने जिंकलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्येही मोलाची कामगिरी केली होती. त्यांनी आपल्या 12 ओव्हरच्या स्पेलमध्ये 6 निर्धाव ओव्हर टाकल्या आणि केवळ 8 रन्स दिल्या होत्या.
    त्यांनी एक विकेटही घेतली होती. 1975 च्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये बिशनसिंग बेदींच्या या कामगिरीमुळे पूर्व आफ्रिका संघाला 120 धावांवर रोखण्यात भारताला यश आलं होतं. भारताने हा सामना जिंकला होता.

    4 ग्रेट बॉलर्स

    बिशन सिंग बेदींनी इरापल्ली प्रसन्ना, बी. एस. चंद्रशेखर आणि एस. वेंकटराघवन या तिघांच्या मदतीने भारतीय फिरकी गोलंदाजीला नवीन ओळख मिळवून दिली. भारतीय फिरकी गोलंदाजांची ही भारतीय क्रिकेट इतिहासातील पहिली प्रभावी फळी होती. बिशनसिंग बेदी यांच्या निधनाने भारतीय जादुई फिरकी स्मृतीशेष उरली आहे.

    Behind the curtain of magical spinning time; Bishan Singh Bedi is gone!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य

    Nishikant Dubey : खासदार निशिकांत दुबे म्हणाले- कोर्ट कायदा बनवणार असेल तर संसद बंद करा; सुप्रीम कोर्ट सीमा ओलांडत आहे