वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतात कुठेही दहशतवादी हल्ला झाला की आधीची भारत सरकारने संपूर्ण जगाकडे मदत मागायची, पण आता मात्र दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असणारा देश भारतापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी जगाकडे भीक मागतो, अशा परखड शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या भारताच्या आक्रमक परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाचे “रहस्य” उलगडून दाखविले. Before the terrorist attack, the Indian government sought help from the entire world.
हिंदुस्थान टाइम्सने आयोजित केलेल्या लीडरशिप मीट मध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते. गेल्या नऊ वर्षांमध्ये मोदी सरकारच्या काळात देशाने केलेल्या अचिव्हमेंट्स पंतप्रधान मोदींनी सविस्तर सांगितल्या. देशातली बहुसंख्य जनता गरिबी रेषेच्या वर आली. मध्यमवर्गीयांची संख्या वाढली. ही संख्या जगातल्या अनेक देशांच्या एकूण लोकसंख्या पेक्षा दुप्पट – तिप्पट असल्याची नोंद संपूर्ण जगाने घेतल्याचे पंतप्रधान मोदींनी आवर्जून सांगितले. भारत जगातल्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे वेगाने वाटचाल करेल आणि 2030 पूर्वीच आपण आपले लक्ष्य गाठले असेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदींचे तडाखे
त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी भारताच्या आक्रमक परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाचे रहस्य उलगडून सांगितले. 2014 पूर्वी भारतात कुठेही दहशतवादी हल्ला झाला की त्यावेळची भारत सरकारे संपूर्ण जगाकडे दहशतवादापासून भारताला वाचवण्यासाठी विनंती करायची, पण आता परिस्थिती पालटली आहे. भारतात दहशतवादी हल्ला झाला तर दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणारा देश संपूर्ण जगाकडे भारतापासून आपला बचाव करण्यासाठी भीक मागत हिंडतो. कारण भारत आता दहशतवादाला जशास तसे उत्तर देतो. किंबहुना दहशतवाद पूर्ण मोडून पडेल असा प्रखर प्रहार करतो, याची जाणीव दहशतवादालाची चिथावणी देणाऱ्या देशांना झाली आहे म्हणूनच त्यांना भारतापासून बचावासाठी जगाकडे भीक मागावी लागते, असे जबरदस्त टोले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाणले.
Before the terrorist attack, the Indian government sought help from the entire world.
महत्वाच्या बातम्या
- Cricket World cup 2023 : मॅट हेन्री विश्वचषकातून बाहेर; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात हाताला दुखापत; न्यूझीलंड संघात जेमिसनचा समावेश
- नेपाळमध्ये 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप, 128 जणांचा मृत्यू; दिल्ली-एनसीआर, एमपी-यूपीतही हादरली धरणी
- जातनिहाय जनगणना, जात आरक्षण राजकीय आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी व्होट बँक बांधणीचा भाजपचा मास्टर प्लॅन