• Download App
    भाजपचे मुकेश दलाल बिनविरोध निवडून आल्याबद्दल काँग्रेसची बोंबाबोंब, पण काँग्रेस सकट अनेक पक्षांचे खासदार निवडून आलेत बिनविरोध!! before Mukesh Dalal, These MPs Got Elected To Lok Sabha Unopposed In The Past

    भाजपचे मुकेश दलाल बिनविरोध निवडून आल्याबद्दल काँग्रेसची बोंबाबोंब, पण काँग्रेस सकट अनेक पक्षांचे खासदार निवडून आलेत बिनविरोध!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : गुजरात मधल्या सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध खासदार म्हणून निवडून आले. त्यामुळे काँग्रेसजनांनी आक्रस्ताळी बोंबाबोंब चालवली आहे. राहुल गांधींपासून जयराम रमेश, अभिषेक मनू सिंघवी यांच्यापर्यंत सगळ्यांनी लोकशाही धोक्यात आल्याचे ढोल पिटले आहेत. काँग्रेस नेत्यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करून केंद्रातल्या मोदी सरकारचा आणि निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध केला आहे. before Mukesh Dalal, These MPs Got Elected To Lok Sabha Unopposed In The Past

    पण आज काँग्रेस नेत्यांनी भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आल्याबद्दल लोकशाही धोक्यात आल्याचा कितीही ढोल पिटला असला तरी, प्रत्यक्षात मुकेश दलाल हे काही बिनविरोध निवडून आलेले एकमेव खासदार नव्हेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी अगदी 1952 पासून जवळजवळ प्रत्येक निवडणुकीत काही खासदार बिनविरोधच निवडून आल्याची इतिहासात उदाहरणे नमूद आहेत.

    यामध्ये महाराष्ट्रातल्या नाशिक मधून यशवंतराव चव्हाण बिनविरोध निवडून आल्याचे उदाहरण ठळक आहे. 1962 मध्ये चीनकडून झालेल्या भारताच्या पराभवानंतर पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीत संरक्षण मंत्री म्हणून बोलवून घेतले होते. त्यावेळी त्या पदावर राहून यशवंतरावांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु नाशिककरांनी त्यांना बिनविरोध निवडून लोकसभेवर पाठवले होते. त्यावेळी लोकशाही धोक्यात आल्याचा ढोल नेहरू सरकारने किंवा त्यावेळच्या विरोधकांनी पिटला नव्हता.

    अगदी 1952 च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत आनंद चांद (बिलासपूर), टी. ए. रामलिंगम चेट्टीयार (कोईमतूर), मेजर जनरल हिमांशसिंगजी (हलर, सौराष्ट्र), टी. संगण्णा (फूलबनी) आणि कृष्णाचार्य जोशी (यादगीर, हैदराबाद) हे काँग्रेसचे नेते लोकसभेवर खासदार म्हणून बिनविरोध निवडून गेले होते.

    याखेरीज जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला, नागालँडचे माजी मुख्यमंत्री आणि चार राज्यांचे माजी राज्यपाल एस. सी. जमीर, ओरिसाचे पहिले मुख्यमंत्री हरेकृष्ण मेहताब हे सगळे नेते बिनविरोध निवडून गेले होते. मात्र, त्यावेळी कोणीही म्हणजे सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष यांनी लोकशाही धोक्यात आल्याची बोंब ठोकली नव्हती.

    2012 मध्ये अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव या उत्तर प्रदेशातल्या कन्नोज लोकसभा मतदारसंघातून बिनविरोधच निवडून आल्या होत्या. त्याआधी 1989 मध्ये फारूक अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्सचे नेते मोहम्मद शफी बट हे देखील श्रीनगर लोकसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून गेले होते.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात मधून भाजपचे मुकेश दलाल लोकसभेवर बिनविरोध निवडून गेले म्हणून बोंबाबोंब चालली असली, तरी प्रत्यक्षात उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, आसाम, तामिळनाडू, ओडिषा, तेलंगणा या राज्यांमधून लोकसभेवर खासदार बिनविरोध निवडून गेल्याची उदाहरणे सापडली.

    before Mukesh Dalal, These MPs Got Elected To Lok Sabha Unopposed In The Past

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक