• Download App
    जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्याची हूल; शिंदे - फडणवीसांमध्ये फूट पाडण्याची धूर्त चाहूल! Before legal action against jitendra avahad NCP targets devendra fadnavis

    जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्याची हूल; शिंदे – फडणवीसांमध्ये फूट पाडण्याची धूर्त चाहूल!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची हूल उठवली आहे, हे प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेसनेही पेटवले आहे. पण या प्रकरण पेटवण्याच्या सर्व राजकीय हालचालींची दिशा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फूट पाडण्याची चाहूल दाखवते आहे. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसची ही धूर्त चाल असल्याचेच स्पष्ट दिसत आहे. Before legal action against jitendra avahad NCP targets devendra fadnavis

    आव्हाडांची “समजूत” काढली

    जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पोलिसांनी महिलेचा विनयभंग केल्याचा 354 कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. या मुद्द्यावरून पुढची कायदेशीर कारवाई सुरू होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने हा मुद्दा पेटवला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची हूल उठवली आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांनी आव्हाडांनी राजीनामा देऊ नये म्हणून त्यांना विनंती केली आहे. खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रवक्त्या विद्या चव्हाण आदींनी जितेंद्र आव्हाड यांची समजूत काढल्याचे दाखविले जात आहे.

     गृह खाते मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे घेण्याची मागणी

    पण त्याच वेळी या सर्व नेत्यांची वक्तव्य मात्र आव्हाडांचे समर्थन करण्याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याकडे असलेले गृह खाते यांना घेरण्यासाठी असलेलेच स्पष्ट दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्याच्या निमित्ताने सर्व विरोधी पक्षीय महिला लोकप्रतिनिधींचा एक गट जमवून राजभवनावर जाऊन राज्यपालांना निवेदन देखील दिले आहे. हे निवेदन देणाऱ्यांमध्ये समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन, ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान आदी नेत्यांचा समावेश आहे. या निवेदनातला बाकीचा तपशील शिंदे – फडणवीस सरकारवर आरोप करणाराच आहे.

    पण त्यातला एक तपशील अधिक महत्त्वाचा आहे, तो म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते काढून घेऊन ते आपल्याकडे घ्यावे, अशी त्यामध्ये मागणी आहे आणि नेमका हीच मागणी राष्ट्रवादीची धूर्त राजकीय खेळीची चाहूल दाखविते आहे. जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्याच्या हूलीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फूट पाडण्याची ही राजकीय खेळी यातून दिसत आहे.

    Before legal action against jitendra avahad NCP targets devendra fadnavis

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!

    Judge Verma bench : जज वर्मा खंडपीठाच्या खटल्यांची पुन्हा सुनावणी होणार; 50 हून अधिक खटले प्रलंबित