Thursday, 8 May 2025
  • Download App
    हनुमान मंदिरे बांधण्याचा वादा करण्यापूर्वी शिवकुमारांनी रस्त्यावर नमाज पढणाऱ्या प्रियांका वाड्रांना विचारलेय का??; स्मृती इराणींचा खोचक सवालBefore arguing about building Hanuman temples, Shivakumar had asked Priyanka Vadra who was offering Namaz on the street

    हनुमान मंदिरे बांधण्याचा वादा करण्यापूर्वी शिवकुमारांनी रस्त्यावर नमाज पढणाऱ्या प्रियांका वाड्रांना विचारलेय का??; स्मृती इराणींचा खोचक सवाल

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बजरंग दलावरच्या बंदीचा मुद्दा जबरदस्त पेटला असताना काँग्रेसला त्या मुद्द्यावर हापटी खावी लागली आणि त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी अंजनेय मंदिरात जाऊन हनुमान चरणी नतमस्तक होऊन संपूर्ण कर्नाटक राज्यात हनुमान मंदिरे बांधण्याचा संकल्प केला. आता या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी डी. के. शिवकुमार यांना खोचक सवाल केला आहे. Before arguing about building Hanuman temples, Shivakumar had asked Priyanka Vadra who was offering Namaz on the street

    एएनआई वृत्तसंस्थेशी बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या, शिवकुमारांनी उगाचच हनुमान मंदिरे बांधण्याचा वादा करू नये. कारण ते मूळातच मुख्यमंत्री बनणार नाहीत. पण त्यापलीकडे जाऊन मी शिवकुमार यांना प्रश्न विचारू इच्छिते, त्यांनी हनुमान मंदिरे बांधण्याचा वादा करण्यापूर्वी प्रियांका वाड्रा यांची परवानगी घेतली आहे का?? कारण मी प्रियांका गांधी यांना अमेठीच्या निवडणुकीत रस्त्यावर नमाज पठण करताना बघितले आहे. अर्थातच जो इस्लाम धर्माला मानतो, तो मूर्तिपूजक असू शकत नाही. तो मूर्तिपूजेला मानत नाही. मग डी. के. शिवकुमार यांनी प्रियंका वाड्रा यांची हनुमान मंदिरे बांधण्याचा वादा करण्यापूर्वी परवानगी घेतली आहे का??, असा सवाल मी त्यांना करू इच्छिते.

    कर्नाटकात काँग्रेसने बजरंग दलावर बंदी घालण्याचा आश्वासन जाहीरनाम्यात दिल्यानंतर हा मुद्दा प्रचंड तापला आहे. भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटनांच्या लाखो कार्यकर्त्यांनी राज्यातल्या हजारो मठ मंदिरांमध्ये जाऊन हनुमान चालीसाचे पठण करून या मुद्द्याला हवा दिली. त्यामुळे प्रचाराच्या ऐन मध्यावर काँग्रेसला बॅकफूटवर जावे लागले.

    अशा स्थितीत डी. के. शिवकुमार यांनी म्हैसूरच्या चामुंडेश्वरी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर अंजनेय मंदिरात जाऊन हनुमानाचे दर्शन घेतले आणि तेथूनच त्यांनी कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर आली, तर राज्यभर हनुमान मंदिर बांधण्याचा आणि जुन्या हनुमान मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला. आता त्याच मुद्द्यावर स्मृती इराणी यांनी, त्यांना प्रियांका वाड्रांना ते विचारलेय का??, असा खोचक सवाल केला आहे.

    Before arguing about building Hanuman temples, Shivakumar had asked Priyanka Vadra who was offering Namaz on the street

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Operation Sindoor impact : पाकिस्तानची दोन f16 विमाने भारतीय मिसाईल्सने पाडली; पाकिस्तानचा जम्मू, जैसलमेरवर मोठा मिसाइल हल्ला, भारताचे जोरदार प्रत्युत्तर!!

    Rohit Sharma : रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त; इंग्लंड दौऱ्यात कर्णधारपदावरून काढून टाकल्याची चर्चा

    Uttarkashi Uttarakhand : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर कोसळले ; पाच ठार, दोन जखमी

    Icon News Hub