ज्या ठिकाणी हिंदू राहतात त्या ठिकाणी गो मांस वर्ज्य केलं जावे. राज्यात गायींच्या संरक्षणासाठी हरएक प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी दिले आहे. आसाममध्ये पुढच्या अधिवेशनात ‘गो संरक्षण विधेयक’ सादर केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Beef ban where Hindus live, assurance of Assam Chief Minister Hemant Biswa Sarma
विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : ज्या ठिकाणी हिंदू राहतात त्या ठिकाणी गो मांस वर्ज्य केलं जावे. राज्यात गायींच्या संरक्षणासाठी हरएक प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी दिले आहे. आसाममध्ये पुढच्या अधिवेशनात ‘गो संरक्षण विधेयक’ सादर केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आसाम विधानसभेत राज्यपालांच्या भाषणानंतर धन्यवाद प्रस्तावात चर्चेदरम्यान ‘एआयइयूडीएफ’नं ‘गो संरक्षण विधेयका’वर चिंता व्यक्त केली. या विधेयकामुळे मॉब लिन्चिंगसारख्या (जमावाकडून हत्या) घटनांना आणखीन प्रोत्साहन मिळेल. उत्तर भारतात याआधीही अशा अनेक घटना घडल्याचं देशानं पाहिल्याचेही त्यांनी म्हटले.
यावर उत्तर देताना सरमा म्हणाले, गाय आपली माता आहे. हिंदू गायींची पूजा करतात. पश्चिम बंगालमधून आम्ही गायींची तस्करी होऊ देणार नाही. ज्या ठिकाणी हिंदू राहतात त्या ठिकाणी गोमांस खाणं वर्ज्य केलं जावं, अशी आमची इच्छा आहे. लखनऊच्या दारुल उलूमनंही असंच वक्तव्य केल्याचं आपण अनेकदा पाहिले आहे.
आसामच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर आपल्या पहिल्या विधानसभा अधिवेशनाच्या अंतिम दिनी सोमवारी सरमा बोलत होते. यापूर्वी, पुढच्या विधानसभा अधिवेशनात राज्य सरकार ‘गो संरक्षण विधेयक’ सादर करू शकतं, असं राज्यपाल जगदीश मुखी यांनी स्पष्ट केलंय.
आसाममध्ये मात्र आसाम गुरे संरक्षण अधिनियम १९५०’ लागू आहे. या कायद्याच्या कलम ५ नुसार, पशु चिकित्सकांकडून ‘वधासाठी योग्य’ असं प्रमाणपत्र जारी करण्यात आलेल्या जनावरांनाच ठार केलं जाऊ शकते.
Beef ban where Hindus live, assurance of Assam Chief Minister Hemant Biswa Sarma
महत्त्वाच्या बातम्या
- कोव्हॅक्सिन टोचल्याने परदेश प्रवासावर गदा, पण ही आहे गुड न्यूज
- माजी गृहमंत्री देशमुख यांच्या निकटवर्तियांवर नागपुरात ईडीचे छापे, मुंबईत जयस्वाल नडण्याची चिन्हे
- फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरचा भारतातील बाजार उठणार ?
- RBI Guideline : जिल्हा मध्यवर्ती बँकांचा राज्य सहकारी बँकेत विलीनीकरणाचा मार्ग मोकळा, राज्य सरकारची शिफारस गरजेची
- डाळींच्या वाढत्या किमतींवर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचे महत्त्वाचे पाऊल, राज्यांना दिले ‘हे’ निर्देश
- महाराष्ट्र पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या : जयजितसिंग यांच्या जागी आयपीएस अधिकारी विनीत अग्रवाल हे महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख