• Download App
    गुजरातच्या मुख्यमंत्र्यांविरुध्द अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या बीडच्या परळीच्या तरुणाला अटक|Beed's Parli youth arrested for making insulting remarks against Gujarat CM

    गुजरातच्या मुख्यमंत्र्यांविरुध्द अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या बीडच्या परळीच्या तरुणाला अटक

    विशेष प्रतिनिधी

    बीड : पंधरा महिन्यांपूर्वी समाज माध्यमातून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याविरुद्ध अपमानास्पद आणि बदनामीजनक टिपणी केल्याप्रकरणी सिरसाळा (ता.परळी) येथील तरुणाला अटक करण्यात आली आहे. अहमदाबाद पोलीसांनी त्याला अटक केली आहे.Beed’s Parli youth arrested for making insulting remarks against Gujarat CM

    बीड जिल्ह्यातील सिरसाळा (ता. परळी) येथील फैसल खान युसुफजई (वय २०) याचे परळीत मोबाइलचे दुकान आहे. पंधरा महिन्यापूर्वी त्याने गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल समाज माध्यमातून बदनामीकारक टिपणी प्रसारित केली होती.



    ही टिपणी कोरोनाच्याअनुषंगाने केली होती. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत अहमदाबाद शहर सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक के.के. मोदी यांनी फैसल खान याच्याविरुध्द १८ एप्रिल २०२० रोजी जनतेत भीती निर्माण करण्याच्या हेतूने किंवा एखाद्या वगार्ला दुखावण्याच्या हेतूने प्रेरित करणारा मजकूर असल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्यात आला.

    राज्य किंवा सार्वजनिक शांततेविरुध्द गुन्ह्यासह आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या संबंधित कलमान्वये त्याच्याविरुध्द कारवाई करण्यात आली होती. तब्बल पंधरा महिन्यानंतर अहमदाबाद सायबर गुन्ह्यांच्या पथकाने बीड जिल्ह्यात येऊन फैसल खान यास नोटीस बजावली.

    Beed’s Parli youth arrested for making insulting remarks against Gujarat CM

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!