• Download App
    बीड : नगरपंचायत निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रावर भाजप - राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी । Beed: BJP-NCP activists clash at polling booths during Nagar Panchayat elections

    बीड : नगरपंचायत निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रावर भाजप – राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी

    पोलिसांनी वातावरण शांत करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांकडून सोम्य लाठीचार्जही करण्यात आला. Beed: BJP-NCP activists clash at polling booths during Nagar Panchayat elections


    विशेष प्रतिनिधी

    बीड : महाराष्ट्रातील १०५ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेदरम्यान भाजप – राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले आणि त्यानंतर मतदान केंद्राच्या गेटवरच दोन्ही गटांत जोरदार हाणामारी झाली आहे.पोलिसांनी वातावरण शांत करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांकडून सोम्य लाठीचार्जही करण्यात आला.

    आज बीड जिल्ह्यात ५ नगरपंचायतीसाठी प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झाली आहे.दरम्यान या मतदानाला सकाळी ७.३० पासून सुरुवात झाली असून सायंकाळी ५.३० पर्यंत चालणार आहे.बीड जिल्ह्यातील वडवणी, केज, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार या ५ ठिकाणच्या नगरपंचायतीसाठी हे मतदान होत आहे.

    या ५ नगरपंचायतमध्ये एकूण ८५ उमेदवार आहेत. त्यापैकी २० जाग्यावर ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने, निवडणूक होणार नाही. परंतु उर्वरित ६५ जागांसाठी बीड जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे.दरम्यान यासाठी तब्बल २१६ उमेदवार आपलं भविष्य आजमावत असून निवडणूक रिंगणात उभे आहेत.

    Beed : BJP-NCP activists clash at polling booths during Nagar Panchayat elections

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये