विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : असदुद्दीन ओवैसी यांना नेहमीच भाजपची बी टीम म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्यांचा दुटप्पी व्यवहार आज समोर आला. तेलंगणा मधल्या जुबिली हिल्स विधानसभा मतदारसंघात हे घडले. Asaduddin Owaisi
जुबिली हिल्स मतदार संघात पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये सत्ताधारी काँग्रेसने नवीन यादव यांना उमेदवारी दिली. त्यांनी डोक्यावर हिरवी टोपी घालून प्रचार केला. त्यांच्या प्रचारात तेलंगणाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे सुद्धा आघाडीवर राहिले. रेवंत रेड्डी यांनी पुढाकार घेऊन AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्याकडे नवीन यादव यांच्यासाठी पाठिंबा मागितला. ओवैसी यांनी तो पाठिंबा दिला.
त्यानंतर जुबिली हिल्स मध्ये काँग्रेसचे नवीन यादव यांचा मुकाबला भारत राष्ट्र समितीच्या मगंती सुनीता गोपीनाथ यांच्याशी झाला. या निवडणुकीत नवीन यादव 24 हजार पेक्षा जास्त मतांनी निवडून आले. पण त्यानंतर त्यांनी जे केले त्याची चर्चा राज्यभर आणि देशभर झाली.
जुबिली हिल्स मतदार संघात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने नवीन यादव यांनी हिरवी टोपी डोक्यावर घालून प्रचार केला होता. त्याचबरोबर असदुद्दीन ओवैसी यांचाही पाठिंबा त्यांना मिळाला होता. असदुद्दीन ओवैसी यांच्याच पाठिंब्यामुळे आपण निवडून आलो, ते त्यांनी जाहीरपणे सांगितले पण तेवढे जाहीरपणे सांगूनच ते थांबले नाहीत तर असदुद्दीन ओवैसी यांच्या घरी जाऊन त्यांच्या पाया पडून नवीन यादव यांनी ओवैसी यांचे आभार मानले.
ओवेसींच्या पाया पडण्याच्या घटनेची चर्चा सगळ्या देशभरात झाली. काँग्रेसच्या तिकिटावर आणि हाताच्या पंजावर निवडणूक लढवलेले उमेदवार नवीन यादव हे असदुद्दीन ओवैसी यांच्या पाया पडतात, या फोटोने फार मोठी राजकीय कहाणी सांगितली.
Became an MLA with the support of Asaduddin Owaisi
महत्वाच्या बातम्या
- वसंतराव नाईक यांचा वारसा काँग्रेसने सोडला, भाजपने घेतला; पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाला काँग्रेसचा एकही बडा नेता नाही फिरकला!!
- India Russia : रशियन कच्च्या तेलाचा भारत दुसरा सर्वात मोठा खरेदीदार; ऑक्टोबरमध्ये ₹22.17 हजार कोटींची आयात झाल
- Al-Falah University : अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध दिल्लीत 2 FIR; स्फोटानंतर फरिदाबादमधील मशिदींमध्ये तपासणी
- OBC reservation : ओबीसींना कमी आरक्षण मिळाले; OBC महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे यांचा इलेक्शन कमिशनवर आरोप, कोर्टात जाण्याचा इशारा