• Download App
    असावा सुंदरही आणि कोविड सुरक्षित चंद्रावर बंगला, सहारनपूरच्या बिल्डरने आईसाठी चंद्रावर खरेदी केला प्लॉट|Beautiful and Covid Safe Moon Bungalow, Saharanpur Builder Bought Plot on Moon for Mother

    असावा सुंदरही आणि कोविड सुरक्षित चंद्रावर बंगला, सहारनपूरच्या बिल्डरने आईसाठी चंद्रावर खरेदी केला प्लॉट

    संपूर्ण जगातच वेगाने पसरत असलेल्या कोरोना रोगापासून आपल्या आईला वाचविण्यासाठी सहारनपूर येथील एका बिल्डरने चक्क चंद्रावर प्लॉट खरेदी केला आहे. एका ऑ नलाईन लिलावात त्यांना पाच लाख रुपयांत हा प्लॉट मिळाला. सहारनरपूर येथील बिल्डर अश्वनी सुखीजा उर्प आश यांनी हा प्लॉट खरेदी केला आहे. पृथ्वीवर वेगाने वाढत असलेल्या कोरोनाच्या साथीमुळे सखीजा यांनी आपल्या आईसाठी हा प्लॉट खरेदी केल्याचे सांगितले.Beautiful and Covid Safe Moon Bungalow, Saharanpur Builder Bought Plot on Moon for Mother


    विशेष प्रतिनिधी

    सहारनपूर : संपूर्ण जगातच वेगाने पसरत असलेल्या कोरोना रोगापासून आपल्या आईला वाचविण्यासाठी सहारनपूर येथील एका बिल्डरने चक्क चंद्रावर प्लॉट खरेदी केला आहे. एका ऑ नलाईन लिलावात त्यांना पाच लाख रुपयांत हा प्लॉट मिळाला.

    सहारनरपूर येथील बिल्डर अश्वनी सुखीजा उर्प आश यांनी हा प्लॉट खरेदी केला आहे. पृथ्वीवर वेगाने वाढत असलेल्या कोरोनाच्या साथीमुळे सखीजा यांनी आपल्या आईसाठी हा प्लॉट खरेदी केल्याचे सांगितले.



    सुखीजा गेल्या अनेक वर्षांपासून बांधकाम व्यवसायात कार्यरत आहेत. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये त्यांचा बांधकाम व्यवसाय पसरलेला आहे. सुखीजा यांनी सांगितले की लुना सोसायटी इंटरनॅशनलच्या वतीने एक आॅनलाईन लिलाव झाला होता.

    त्यामध्ये त्यांनी भाग घेतला. त्यांना एक एकर क्षेत्रासाठी बोली लावण्याची संधी मिळाली. त्यासाठी त्यांनी पाच लाख रुपयांची बोली लावली. हे पैसे ऑनलाईनद्वारे त्यांनी पाठविलेही. त्यानंतर सोसायटीने त्यांना प्लॉट रजिस्टर झाल्याची कागदपत्रेही पाठविली.

    त्यामध्ये सुखिजा यांची मालकी चंद्रावरील जमीनीवर दाखविण्यात आली आहे. या जागेचे नकाशाही त्यांना पाठविला गेला आहे.सुखिजा म्हणाले चंद्रावर मिळालेल्या प्लॉटवर ते घर बांधणार आहेत.

    तेथे आपल्य आईला ठेवणार आहे. त्यामुळे आई कोरोना संसर्गापासून दूर राहिल. त्यामुळेच त्यांनी आईच्या नावाने हा प्लॉट खरेदी केला आहे.
    सुखिजा म्हणाले, गेल्या वर्षभरात लॉकडाऊनमुळे बांधकाम व्यवसायात मंदी आहे. त्यामुळे चंद्रावर खरेदी केलेल्या या प्लॉटमधून त्यांना चांगले पैसेही मिळण्याची आशा आहे.

    यापूर्वी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत, अभिनेता शाहरुख खान, आग्रा येथील एका व्यावसायिका आणि उल्हासनगरमधील बांधकाम व्यावसायिक राम वाधवा यांनीही चंद्रावर जमीन खरेदी केली आहे.

    Beautiful and Covid Safe Moon Bungalow, Saharanpur Builder Bought Plot on Moon for Mother

    विशेष प्रतिनिधी

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य