• Download App
    सावधान ! कोरोनामुक्त रुग्णांवर काही महिन्यात मृत्यूचा पाश; संशोधकांचा दावा|Be careful! Death trap in a few months on corona-free patients; Researchers claim

    सावधान ! कोरोनामुक्त रुग्णांवर काही महिन्यात मृत्यूचा पाश; संशोधकांचा दावा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोनातून तुम्ही बरे झालात. अत्यंत आंनदाची गोष्ट आहे. पण, तुम्ही त्यातून कायमची सुटका झालेली नाही. तुमच्यावर मृत्यूचे संकट काही महिने असते, असा दावा संशोधकांनी केला आहे.Be careful! Death trap in a few months on corona-free patients; Researchers claim

    कोरोनाचे संक्रमण, अन्य असलेले आजार आणि रोगप्रतिकारशक्ती याचा विचार प्रामुख्याने करावा लागेल. त्यात रोगप्रतिकारशक्ती महत्वाची भूमिका बजावते. कोरोनाची बाधा आणि सहव्याधीमुळे प्रकृती चिंताजनक बनते.



    या दोन्ही रुग्णांमध्ये कोरोनातून बरे झाल्यानंतरही लक्षणे दीर्घकाळ राहू शकतात, असे संशोधकांनी म्हटले आहे. यामुळे रुग्णांचा मृत्यू होण्याचीही भीती असते असा दावाही या संशोधकांचा आहे.

    इंग्लंडमधील संशोधनपत्रिका ‘नेचर’ मध्ये याबाबतचे अभ्यासवृत्त प्रसिद्ध झाले आहे. अमेरिकेतील साथरोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानेही एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात म्हटलंय की कोरोनाची हलकी लक्षणे असलेल्या रुण्गांमध्ये काही महिन्यांनी नवी लक्षणे दिसत आहेत.

    इंग्लंडमधील संशोधकांनी 87 हजार कोरोना रुग्ण आणि 50 लाख इतर रुग्णांच्या माहितीचा अभ्यास केला. यामध्ये कोरोनातून बरे झाल्यानंतर 6 महिन्यांपर्यंत रुग्ण दगावण्याचा धोका 59 टक्क्यांपेक्षा अधिक असतो.

    संशोधनातं असे स्पष्ट झाले की 6 महिन्यांत एक हजारांपैकी किमान 8 मृत्यूमुखी पडलेले रुग्ण असे होते ज्यांना दीर्घकाळ कोरोनाची लक्षणे होती. या रुग्णांचा मृत्यू कोरोनाशी जो़डून पाहिला जात नाही.

    6 महिन्यांत एक हजारांपैकी मृत्यूमुखी पडलेले 29 रुग्ण असे होते जे 30 दिवसांपेक्षा अधिक काळ रुग्णालयात उपचार घेऊन आले होते.

    Be careful! Death trap in a few months on corona-free patients; Researchers claim

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Raghuram Rajan : रघुराम राजन म्हणाले- रशियन तेल खरेदीबाबत पुन्हा विचार व्हावा; याचा फायदा कोणाला?

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो