विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताच्याच नव्हे तर जगाच्या क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर अर्थात BCCI वर पैशांचा पाऊस पडतोय. 30000 कोटींची गंगाजळी आणि नुसते ठेवींच्या व्याजातून मिळताहेत 1000 कोटी!!, एवढ्या प्रचंड पैशांमध्ये भारतीय क्रिकेट नियमक मंडळ लोळतेय. भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचे उत्पन्न आणि त्याच्याकडे पाहिले तर डोळे फिरायची पाळी आली.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जगाच्या क्रिकेटवर नियंत्रण मिळवले आहे. पूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमक मंडळ इतरांवर नियंत्रण ठेवायचे, पण आता भारतीय क्रिकेट नियमित मंडळाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमक मंडळावर आर्थिक नियंत्रण बसले आहे, याची कबुली आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमक मंडळाला द्यावी लागली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षात पाकिस्तानने काही सामने रद्द केले तरी त्याचा कुठलाही परिणाम भारतीय क्रिकेट नियमक मंडळावर झाला नाही.
IPL सोन्याची कोंबडी
2007 मध्ये आयपीएल नावाची सोन्याची कोंबडी मिळाल्याचा हा परिणाम आहे. आयपीएल सध्या भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचा उत्पन्नाचा सगळ्यात मोठा सोर्स बनलाय. 2024 मध्ये भारतीय क्रिकेट नियमक मंडळाला 9741.7 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यात आयपीएलचा वाटा 5761 कोटी रुपयांचा राहिला. याखेरीज भारतीय क्रिकेट नियमन मंडळाकडे क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपणाच्या अधिकारातून 361 कोटी रुपयांची कमाई झाली.
भारतीय क्रिकेट नियमक मंडळाची गंगाजळीच 30000 कोटी रुपयांची आहे. तिच्या व्याजातून मंडळाला एक हजार कोटी रुपये मिळतात. याखेरीज वुमन्स प्रीमियर लीग मंडळाच्या उत्पन्नात भर घालते.
भारतात फक्त आयपीएल नाही, तर वेगवेगळ्या महान क्रिकेटपटूंच्या नावाने वेगवेगळ्या ट्रॉफीचे सामने होतात. रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी, देवधर ट्रॉफी, सी के नायडू ट्रॉफी यांचे सामने कमर्शियल करण्याचा भारतीय नियमक मंडळाकडे पर्याय आहे यातून नियमक मंडळाचे उत्पन्न वाढण्याबरोबरच या सगळ्या ट्रॉफींचे सामने देखील रंगतदार होऊन त्यातून भारतीय टीमला दर्जेदार खेळाडू मिळणे शक्य होईल.
BCCI’s wealth hits jaw-dropping levels — sitting on 30,000 crore in reserves
महत्वाच्या बातम्या
- बरोबरच आहे राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट फडणवीस कशाला लिहून देतील??, पण…
- India-UK : भारत-ब्रिटनमध्ये FAT वर स्वाक्षरीची शक्यता; ब्रिटनच्या आलिशान गाड्या आणि ब्रँडेड कपडे स्वस्त होणार
- Robert Vadra : गुरुग्राम लँड डीलमध्ये रॉबर्ट वाड्रा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल; पहिल्यांदाच ईडीने औपचारिक आरोपी बनवले
- पडळकरांच्या मुद्द्यावरून पत्रकारांनी फडणवीसांना छेडले; पण अजितदादांना शेजारी बसवून फडणवीसांनी आव्हाडांचेही वाभाडे काढले!!