वृत्तसंस्था
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्त्री – पुरुष समानतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. बीसीसीआयने महिला क्रिकेटर्सना पुरुषांसारखे एकसमान मॅच फी देण्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह या निर्णयाचे ट्विट केले आहे. महिला क्रिकेट खेळाडूंना यापुढे पुरुषांसारखेच वेतन दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. BCCI’s historic decision; Equal pay for male and female Indian cricketers
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी अध्यक्षपदाचा पदभार सोडल्यानंतर काही दिवसांतच बीसीसीआयने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयच्या निर्णयामुळे पुरुष आणि स्त्री क्रिकेटपटूंना एकसमान म्हणजे प्रत्येक कसोटीसाठी 15 लाख रुपये, 1 दिवसीय सामन्यासाठी 6 लाख रुपये आणि t20 सामन्यासाठी तीन लाख रुपये वेतन मिळणे अपेक्षित आहे.
स्त्री-पुरुष क्रिकेटपटूंच्या वेतनातली तफावत दूर करण्याची मागणी पूर्वीपासून करण्यात येत आहे. परंतु, या आधी विविध कारणांमुळे त्याची अंमलबजावणी होत नव्हती. आता मात्र बीसीसीआयने निर्णय घेऊन स्त्री-पुरुष क्रिकेटपटूंचे वेतन समान केले आहे.
BCCI’s historic decision; Equal pay for male and female Indian cricketers
महत्वाच्या बातम्या