• Download App
    बारटी, सारथी, महाज्योती फेलोशिप परीक्षेत गोंधळ; 2019 ची प्रश्नपत्रिका जशास तशी 2023 ला आल्याचा आरोप|Barty, Sarathi, Mahajyoti mess up in fellowship exam; The allegation that the question paper of 2019 came as it was in 2023

    बारटी, सारथी, महाज्योती फेलोशिप परीक्षेत गोंधळ; 2019 ची प्रश्नपत्रिका जशास तशी 2023 ला आल्याचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये 2023 च्या परीक्षेत चक्क 2019 चाच पुन्हा पेपर देण्यात आला आहे. बारटी, सारथी आणि महाज्योती या फेलोशिपसाठी राज्य सरकारने परीक्षा घेतली असून, राज्यभरात ही परीक्षा झाली आहे. मात्र याच परीक्षेत प्रश्नपत्रिकांचा वेगळाच गोंधळ समोर आला आहे. यापूर्वी 2019 मध्ये तयार करण्यात आलेली प्रश्नपत्रिका 2023 च्या परीक्षेत जशाचतशी छापण्यात आली आहे. त्यामुळे यावर विध्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे.Barty, Sarathi, Mahajyoti mess up in fellowship exam; The allegation that the question paper of 2019 came as it was in 2023



    दरम्यान राज्यभरात बारटी, सारथी आणि महाज्योती या फेलोशिपसाठी राज्य सरकारने परीक्षा आयोजित केली आहे. मात्र, परीक्षा केंद्रात जाताच विध्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण, 2019 च्या परीक्षेसाठी तयार करण्यात आलेली प्रश्नपत्रिका पुन्हा 2023 च्या परीक्षेत विध्यार्थ्यांना देण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रश्नपत्रिकेत अगदी प्रश्नांचा क्रम सुद्धा तोच होता. 2019 मध्ये सेटसाठी जी परीक्षा घेण्यात आली होती, तोच पेपर 2023 च्या या फेलोशिपच्या परीक्षेसाठी वापरण्यात आला आहे. आता यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जुन्या पेपरच्या माध्यमातून अभ्यास केला आहे, त्यांना या परीक्षेत पूर्णपैकी पूर्ण गुण मिळण्याची सुद्धा शक्यता आहे.

    विद्यार्थ्याचा आरोप

    आजचा सारथी महाज्योती आणि बार्टीच्या फेलोशिपसाठी जो पेपर घेण्यात आला तो पेपर फुटल्याचा आरोपही काही विद्यार्थ्यांनी केलाय पेपर हा फुटलेल्या इन्व्हलपमध्ये आला होता. तसेच त्याच्यावर विद्यार्थ्यांच्या सह्या सुद्धा घेतल्या नाही. त्यामुळे हा पेपर आधीच फोडला होता असाही आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांनी आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

    कॉपी पेस्ट प्रश्नपत्रिका

    बारटी, सारथी, महाज्योती फेलोशिप परीक्षेत कॉपी पेस्ट प्रश्नपत्रिका समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने नवा पेपर काढण्याचीही तसदी घेतली नाही. फक्त 2019 जुना पेपर कॉपी करून 2023 साठी पेस्ट करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या परीक्षांमध्ये सतत गोंधळ पाहायला मिळत आहे. काही परीक्षेत प्रश्न चुकीचे असतात, तर काही ठिकाणी पर्याय चुकीचे दिल्याचे पाहायला मिळाले. अनकेदा अभ्यासक्रमाच्या बाहेरील प्रश्न देखील विचारण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहे.

    Barty, Sarathi, Mahajyoti mess up in fellowship exam; The allegation that the question paper of 2019 came as it was in 2023

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bangladesh : बांगलादेशात हिंदू नेत्याची हत्या, भारताची तीव्र प्रतिक्रिया

    France : भारताने घेतला मोठा निर्णय! फ्रान्सकडून खरेदी करणार जगातील सर्वात धोकादायक 40 लढाऊ जेट्स

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी