दिल्ली पोलिसांनी गाझीपूर आणि टिकरी सीमेवरील बॅरिकेड्स हटवले आहेत. पोलिसांच्या या कारवाईनंतर दिल्ली-एनसीआरमधील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अद्याप वाहतूक सुरू झालेली नाही. टिकरी हद्दीतील 40 फुटी रस्ता खुला करण्यात आला आहे, मात्र मार्ग खुला केल्याने संतप्त शेतकरी रस्त्यावरच ठाण मांडून बसले आहेत. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे की, शेतकरी बॉर्डर रिकामी करणार नाहीत. Barricades removed from Delhi’s borders, angry farmers sitting on the road opening 40 feet on Tikri border
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी गाझीपूर आणि टिकरी सीमेवरील बॅरिकेड्स हटवले आहेत. पोलिसांच्या या कारवाईनंतर दिल्ली-एनसीआरमधील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अद्याप वाहतूक सुरू झालेली नाही. टिकरी हद्दीतील 40 फुटी रस्ता खुला करण्यात आला आहे, मात्र मार्ग खुला केल्याने संतप्त शेतकरी रस्त्यावरच ठाण मांडून बसले आहेत. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे की, शेतकरी बॉर्डर रिकामी करणार नाहीत.
बॅरिकेड्स हटवल्याने शेतकरी संतप्त
प्रशासनाने टिकरी हद्दीवरील बॅरिकेड हटविण्याचा प्रयत्न केला असता शेतकऱ्यांनी मोर्चा उघडला. 10 फुटांचा तातडीचा मार्ग उघडण्याचे बोलून पोलिसांनी 40 फूट उघडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. एकीकडे शेतकऱ्यांनी कधीच रास्ता रोको केला नसल्याचं म्हटले, पण प्रत्यक्षात मात्र पोलीस त्यांचे बॅरिकेड्स हटवत असल्यानं नाराजी व्यक्त होत आहे.
बागपत येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आलेले शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सीमा रिकामी करण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले. गेल्या 11 महिन्यांपासून राजधानी दिल्लीला लागून असलेल्या सर्व सीमेवर लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल देशातील सर्वात मोठ्या न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. आता बॅरिकेड्स हटवल्यानंतरही सीमेवरील परिस्थिती सामान्य होईल, असे वाटत नाही.
Barricades removed from Delhi’s borders, angry farmers sitting on the road opening 40 feet on Tikri border
महत्त्वाच्या बातम्या
- प्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या आकस्मित निधनानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
- स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सात बेड्या तोडून हिंदुत्वाला सबळ केले; रणजित सावरकर यांचे प्रतिपादन
- शिवसेनेचे चार मोहरे राष्ट्रवादीत , कोकणात झाला करेक्ट कार्यक्रम
- केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात , ‘ या ‘ दिवशी मिळणार बोनससह DA च्या थकबाकीचे पैसे