प्रतिनिधी
बारामती : बारामती म्हणजे शरद पवार हे समीकरण आज उद्ध्वस्त झाले. पुतण्याने काकांवर संपूर्ण मात केली. मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने पुतण्याच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची काकांची खेळी देखील फसली. बारामती तालुका अजित पवारांनी एकहाती जिंकला. शरद पवारांवर आपल्याच तालुक्यातल्या ग्रामपंचायती पूर्णपणे गमावण्याची वेळ आली.Baramati means Sharad Pawar equation destroyed; Ajit Dada’s complete dominance over the taluk!!; Ajitdada 24, BJP 2, Sharad Pawar group
बारामती म्हटलं शरद पवार आणि शरद पवार म्हटलं की बारामती हे समीकरण मागच्या 50 वर्षांहून अधिक काळ रुढ होते, ग्रामपंचायत निवडणुकीत ते उद्ध्वस्त झाले. अजित पवार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला गेल्यानंतर राष्ट्रवादी दोन गटात विभागली गेली. या सगळ्या घडामोडीनंतर राज्यात पहिलीच निवडणूक पार पडली. राज्यातील अडीच हजार ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. अशात बारामतीतील परिस्थिती काय आहे? बारामती पवारसाहेबांची की अजितदादांची? या प्रश्नाचे उत्तर “अजितदादांची”, असे बारामतीतील ग्रामीण भागातील जनतेनं या ग्रामपंचायत निवडणुकीत दिले.
बारामती तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींपैकी 26 ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आहे. या 26 पैकी 24 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे वर्चस्व निर्माण झाले, तर 2 ग्रामपंचायतीत भाजपचा सरपंच निवडून आला आहे. शरद पवार गटाचा स्कोअर 0 आहे.
अजित पवार गटाने जिंकलेल्या ग्रामपंचायती
अजित पवार यांचं बारामतीत वर्चस्व पाहायला मिळतंय. अजित पवार गटाने 24 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.
1) भोंडवेवाडी 2) म्हसोबा नगर 3) पवई माळ
4) आंबी बुद्रुक 5) पानसरे वाडी 6)गाडीखेल
7) जराडवाडी 8) करंजे 9) कुतवळवाडी
10) दंडवाडी 11) मगरवाडी 12) निंबोडी
13) साबळेवाडी 14) उंडवडी कप 15) काळखैरेवाडी 16) चौधरवाडी 17) वंजारवाडी
18) करंजे पूल 19) धुमाळवाडी 20) कऱ्हावागज 21) सायंबाचीवाडी 22) कोऱ्हाळे खुर्द 23) शिर्सुफळ 24) मेडद
बारामती तालुक्यात भाजपने 2 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. दोन ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. चांदगुडेवाडीत भाजपचा सरपंच आहे. बारामती तालुक्यातील पारवडीतही भाजप उमेदवाराचा विजय झाला आहे. बारामती तालुक्यात आत्तापर्यंत 26 पैकी 24 जागी राष्ट्रवादीचा सरपंच तर 2 जागी भाजपचा सरपंच निवडून आला आहे.
पवारांच्या काटेवाडीच्या ग्रामपंचायतीचा देखील आज निकाल आहे. काटेवाडी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत झाली. अजित पवारांच्या पॅनल विरोधात भाजपचे पॅनेल उभे होते. काटेवाडी ग्रामपंचायतीवर कित्येक वर्षे राष्ट्रवादीची एक हाती सत्ता राहिली आहे. मात्र यंदा इथे नेमके काय होणार??, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Baramati means Sharad Pawar equation destroyed; Ajit Dada’s complete dominance over the taluk!!; Ajitdada 24, BJP 2, Sharad Pawar group
महत्वाच्या बातम्या
- जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांची ५३८ कोटींची मालमत्ता जप्त ; ‘ED’ची कारवाई
- बिहारमध्ये मोठी दुर्घटना! शरयू नदीत बोट उलटली; १८ जण बुडाले, ७ बेपत्ता
- श्रद्धा कपूरसमोर तुटली पापाराझीच्या महागड्या कॅमेऱ्याची लेन्स! श्रद्धा च्या आश्वासनामुळे श्रद्धाच होते कौतुक!
- क्रिकेटच्या देवाचा वानखेडेवर पुतळा; सी. के. नायडूंनंतर सचिनला मिळाला मान आगळा !!