• Download App
    समीर वानखेडे यांचे बार अँड रेस्टॉरंट परवाना त्यांच्या नावावर असल्याचे उघड|Bar & Restaurant License name of Sameer Wankhede

    WATCH : समीर वानखेडे यांचे बार अँड रेस्टॉरंट परवाना त्यांच्या नावावर असल्याचे उघड

    विशेष प्रतिनिधी

    नवी मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर खंडणी व नोकरी मिळवण्यासाठी बनावट जातप्रमाणपत्र बनवल्याचा आरोप होत आहे. पण, आता त्यांच्या नावावर बार अँड रेस्टॉरंटचा परवाना असल्याचं समोर आलेआहे.Bar & Restaurant License name of Sameer Wankhede

    ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.नवी मुंबईतील वाशी येथे हा बार आहे. अबकारी खात्याच्या रेकॉर्डनुसार, हॉटेल सद्गुरूचा परवाना वानखेडे यांच्या नावावर आहे. २७ ऑक्टोबर १९९७ रोजी हा परवाना देण्यात आला होता. नियमानुसार त्याचं नुतनीकरण करण्यात आलं आहे.



    हा परवाना ३१ मार्च २०२२ पर्यंत वैध आहे. या हॉटेलात विदेशी व भारतीय बनावटीचं मद्य विकण्याची मुभा आहे. बारचा परवाना समीर वानखेडे यांच्या नावावर आहे. भारत सरकारच्या सेवेत आल्यापासून त्यांनी वडील ज्ञानदेव वानखेडे यांना त्याच मुखत्यार पत्र दिलं आहे.

    •  समीर वानखेडे यांचे बार अँड रेस्टॉरंट
    • वाशीत हॉटेल सद्गुरूचा परवाना नावावर
    •  २७ ऑक्टोबर १९९७ रोजी दिला परवाना
    • हा परवाना ३१ मार्च २०२२ पर्यंत वैध
    • विदेशी व भारतीय बनावटीचं मद्य विकण्याची मुभा
    • वडील ज्ञानदेव वानखेडे यांना मुखत्यार पत्र दिले

    Bar & Restaurant License name of Sameer Wankhede

    Related posts

    Delhi Turkman Gate : दिल्लीत मध्यरात्री पोलीस-MCD पथकावर दगडफेक; मशिदीजवळ अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोहोचले होते

    Election Commission : 12 राज्यांमध्ये SIR- मसुदा यादीत 13% मतदार कमी झाले; UP मध्ये सर्वाधिक 2.89 कोटी मतदार यादीतून वगळले

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- रस्ते भटक्या कुत्र्यांपासून मोकळे करणे आवश्यक; ते अपघातांना कारणीभूत