वृत्तसंस्था
हैदराबाद : एसएससी पेपर लीक प्रकरणात तेलंगणा भाजपचे अध्यक्ष बंदी संजय कुमार यांना जामीन मिळाला आहे. शुक्रवारी त्यांची तुरुंगातून सुटका झाली. वारंगल दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी संजय यांना 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. जामीन मंजूर करताना न्यायालयाने बंदी संजय देश सोडणार नाहीत, तपासात सहकार्य करतील आणि साक्षीदारांना धमकावणार नाहीत, अशी अट ठेवली आहे.Banned Telangana BJP president Sanjay Kumar released from jail, court says – don’t threaten witnesses, can’t leave country
उच्च न्यायालयाकडून दिलासा नाही
बंदी संजय तेलंगणातील करीमनगरमधून लोकसभेचे खासदार आहेत. एसएससी हिंदी पेपर लीकप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी त्यांना अटक केली. बुधवारी अटकेत असलेल्या संजय यांच्यासह 4 जणांना 2 आठवड्यांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यानंतर संजय यांनी दिलासा मिळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाकडून त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने त्यांना स्थानिक न्यायालयात याचिका दाखल करण्यास सांगितले होते. यासोबतच या प्रकरणाची सुनावणी 10 एप्रिलला होणार असल्याचे सांगण्यात आले.
काय आहे पेपर लीक प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (एसएससी) बोर्डाची हिंदी परीक्षा 4 एप्रिल रोजी वारंगलमध्ये सुरू झाल्यानंतर काही वेळातच हा पेपर फुटला होता. याप्रकरणी पोलिसांनी बंदी संजय यांना आरोपी बनवले होते.
पोलिसांनी रिमांड अहवालात दावा केला आहे की, संजय यांनी दोन जणांसोबत पेपर लीक करण्याचा कट रचला होता. हा पूर्वनियोजित कट असल्याचे पोलिसांनी सांगितले. याद्वारे आरोपींना लोकांमध्ये अफवा आणि अशांतता पसरवायची होती.
याप्रकरणी 10 जणांना आरोपी करण्यात आले आहे. त्यांच्यावर आयपीसीच्या कलम 120 बी (गुन्हेगारी कट), 420 (फसवणूक) आणि कलम 505 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तीन दिवस आधी अटक
पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 एप्रिल रोजी तेलंगणा दौऱ्यावर जाणार आहेत. हैदराबादमध्ये ते वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या अवघ्या तीन दिवस आधी बंदी संजय यांच्या अटकेने तेलंगणातील राजकीय वातावरण तापले होते. या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.
Banned Telangana BJP president Sanjay Kumar released from jail, court says – don’t threaten witnesses, can’t leave country
महत्वाच्या बातम्या
- Colonial loot : ब्रिटीशांनी भारतातून ‘कोहिनूर’सह मौल्यवान रत्न कशी लुटली?
- आमदार महेश लांडगे, वसंत मोरे, अविनाश बागवेंना खंडणीसाठी धमकी देणाऱ्या इम्रान शेखला पोलिसांच्या बेड्या
- जम्मू-काश्मीर: तब्बल ७० कोटींच्या ११ किलो ‘हेरॉईन’सह दोन पाकिस्तानी तस्करांना अटक
- ठाणे शहर काँग्रेसचा राहुल गांधींना “दणका”; सत्याग्रह यात्रेत दिसणार सावरकर नावाचा महिमा!!