• Download App
    नव्या वर्षात जानेवारीमध्ये अर्धा महिना बॅँका राहणार बंद|Banks will be closed for half a month in January in the new year

    नव्या वर्षात जानेवारीमध्ये अर्धा महिना बॅँका राहणार बंद

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : नवीन वर्षांच्या पहिल्याच महिन्यात बॅँका अर्धा महिना बंद राहणार आहेत. जानेवारी २०२२ मध्ये खासगी आणि सार्वजनिक बँकांचे कामकाज तब्बल १६ दिवस बंद राहणार आहे.वर्षाच्या पहिल्याच दिवशी १ जानेवारी रोजी बँकांना नवीन वषार्ची राष्ट्रीय सुट्टी आहे.Banks will be closed for half a month in January in the new year

    २ जानेवारी रविवार आहे. ४ जानेवारी रोजी सिक्कीममध्ये बँकाना रजा असेल. पुढे ८ जानेवारी रोजी दुसरा शनिवार आणि ९ जानेवारी रोजी रविवार अशा सलग दोन दिवस बँका बंद राहतील.११ जानेवारी मिशनरी डे निमित्त मिझोरममध्ये बँकांना सार्वजनिक सुट्टी आहे.



    १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंती निमित्त पश्चिम बंगालमध्ये बँकांना रजा असेल. १४ जानेवारी राजी बहुतांश राज्यांमध्ये पोंगल आणि मकर संक्रातीनिमित्त बँक हॉलिडे देण्यात आला आहे. १५ जानेवारी रोजी पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये बँकांना सार्वजनिक सुट्टी असेल.

    चेन्नईमध्ये १८ जानेवारी स्थानिक पातळीवर बँकांना सुट्टी असेल. २२ जानेवारी रोजी चौथा शनिवार आणि २३ जानेवारी रोजी रविवार अशा दोन दिवस बँका बंद राहतील. २५ जानेवारी रोजी हिमाचल प्रदेशमध्ये बँकांना सुट्टी असेल. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमीत्त बँकांना राष्ट्रीय सुट्टी असेल. ३१ जानेवारी रोजी आसाममध्ये बँका बंद असतील.

    Banks will be closed for half a month in January in the new year

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Indian Army : भारतीय लष्कराने जारी केला एक व्हिडिओ अन् पाकिस्तानच्या खोटेपणचा बुरखा फाटला

    Operation sindoor : अणुबॉम्ब टाकायचाय की युद्ध नकोय??, पाकिस्तानातल्या नेत्यांमध्येच गोंधळ; त्यात विमानतळ आणि लष्करी तळांच्या नुकसानीची भर!!

    BSF : बीएसएफने पाकिस्तानचे अनेक दहशतवादी लाँच पॅड केले उद्ध्वस्त