• Download App
    |Banks to recover loans of Vijay Malya by selling Rs 5,500 crore shares of United Breweries to Vijay Mallya

    विजय मल्याला दणका, युनायटेड ब्रेवरीजमधील ५५०० कोटी रुपयांचे शेअर्स विकून बॅँका वसूल करणार बुडीत रक्कम

    विविध बँकांची तब्बल नऊ हजार कोटी रुपयांची कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेला किंगफिशरचा मालक आणि एकेकाळचा मद्यसम्राट विजय मल्या याला बॅँका चांगलाच दणका देण्याच्य तयारीत आहेत. युनायटेड ब्रेवरीजमधील विजय मल्याच्या मालकीची १६.१५ टक्के हिस्सेदारी विकण्याची तयारी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँक समूहाने चालविली आहे. ५,५०० कोटी रुपये मूल्याचे हे समभाग विकण्यासाठी बँक समूहाने एसबीआय कॅपिटलशी बोलणी सुरू केली आहेत.Banks to recover loans of Vijay Malya by selling Rs 5,500 crore shares of United Breweries to Vijay Mallya


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : विविध बँकांची तब्बल नऊ हजार कोटी रुपयांची कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेला किंगफिशरचा मालक आणि एकेकाळचा मद्यसम्राट विजय मल्या याला बॅँका चांगलाच दणका देण्याच्य तयारीत आहेत.

    युनायटेड ब्रेवरीजमधील विजय मल्याच्या मालकीची १६.१५ टक्के हिस्सेदारी विकण्याची तयारी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँक समूहाने चालविली आहे. ५,५०० कोटी रुपये मूल्याचे हे समभाग विकण्यासाठी बँक समूहाने एसबीआय कॅपिटलशी बोलणी सुरू केली आहेत.



    विजय मल्ल्याच्या मालकीच्या समभागांची ब्लॉक डील पद्धतीने विक्री केली जाणार आहे. कर्ज घेताना मल्ल्याने तारण दिलेल्या नऊ हजार कोटी रुपयांच्या मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केल्या होत्या.

    या मालमत्ता पुन्हा बँकांच्या ताब्यात देण्याचा निर्णय मुंबईतील मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा न्यायालयाने याच आठवड्याच्या दिला आहे.किंगफिशर एअरलाइन्स कर्ज प्रकरणात मल्ल्या यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे.

    या प्रकरणाची ईडी आणि सीबीआय चौकशी करीत असतानाच मल्या याने देशातून पलायन केले होते .बँका चालू तिमाहीतच मल्ल्या यांच्या मालकीच्या समभागांची विक्री करू शकतील.

    आपण बँकांना तडजोडीचे कित्येक प्रस्ताव दिले असल्याचा दावा मल्ल्या यांनी यापूर्वी केला आहे.न्यायालयाने म्हटले आहे की, मल्ल्या निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्यास मालमत्ता पुन्हा त्यांच्या ताब्यात द्याव्यात.

    त्याआधी बंगळुरूच्या ऋण वसुली प्राधिकरणाने बँकांना मल्याच्या मालमत्ता विकण्याची परवानगी दिली होती.ब्रिटनच्या उच्च न्यायालयानेही मल्याला दणका देत दिवाळखोरीची याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे या प्रॉपर्टीवर असलेलं सुरक्षा कव्हर हटवले गेले आहे.

    भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वात भारतीय बँकांच्या कन्सोर्टियमने ब्रिटनच्या उच्च न्यायालयात मागणी केली होती की, विजय मल्ल्या याच्या भारतातील संपत्तीवर असलेलं सुरक्षा कव्हर हटवण्यात यावं.

    उच्च न्यायालयाने बँकांची ही मागणी मान्य केली आहे. लंडन उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे भारतीय बँका मल्ल्याची संपत्ती जप्त करुन त्याचा लिलाव करु शकतील आणि आपली रक्कम वसूल करु शकतील.

    विजय मल्ल्या पूर्णपणे कंगाल झाल्याची माहिती आहे. क आर्थिक नाकेबंदी झाल्याने मल्ल्याकडे वकिलांना देण्याइतपतही पैसे नाहीत. त्यामुळे वेळेत फी नाही दिली तर खटला लढणार नसल्याचा इशारा त्याच्या वकिलाने दिला आहे. त्यामुळे मल्ल्याची डोकेदुखी वाढली आहे.

    Banks to recover loans of Vijay Malya by selling Rs 5,500 crore shares of United Breweries to Vijay Mallya

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य