• Download App
    अबब डिसेंबरमध्ये 16 दिवस बँका बंद ! पटापट करा कामं ; आरबीआयने जारी केली सुट्ट्यांची यादी...Banks closed for 16 days in December

    Bank Holidays : अबब डिसेंबरमध्ये 16 दिवस बँका बंद ! पटापट करा कामं ; आरबीआयने जारी केली सुट्ट्यांची यादी…

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आता डिसेंबर महिना सुरू होईल. जर तुम्ही डिसेंबर महिन्यात बँकेशी संबंधित काम करणार असाल तर आधी आरबीआयने जारी केलेल्या सुट्ट्यांची यादी नक्की तपासून पाहा. येणाऱ्या डिसेंबर महिन्यात 16 दिवस बँका बंद (Bank Holidays December 2021) राहणार आहेत. Banks closed for 16 days in December

    पुढील महिन्यात एकूण 16 दिवस बँकांना सुट्ट्या (Bank Holidays November) असतील, ज्यामध्ये 4 सुट्ट्या रविवारी असतील. यातील अनेक सुट्ट्याही लागोपाठ असणार आहेत. डिसेंबर महिन्यात ख्रिसमसचा सण येतो, याची सुट्टी देशातील जवळपास सर्व बँकांना असते. दरम्यान, प्रत्येक ठिकाणी जवळपास 16 दिवस बँका बंद राहणार नाहीत. काही सुट्ट्या स्थानिक असल्याने तेथील विशेष सणांनुसार बँका बंद राहतील.

    दरम्यान, आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. येथे आरबीआयच्या डिसेंबर महिन्याच्या यादीसोबत हे देखील सांगण्यात येत आहे की, कोणत्या दिवशी बँका कोणत्या राज्यात बंद राहतील आणि कुठे उघड्या राहतील. या आधारावर तुम्ही तुमच्या बँकेशी संबंधित कामाचा निपटारा ताबडतोब करावा जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये.

    डिसेंबर 2021 मध्ये बँकेला सुट्ट्या..

    • 3 डिसेंबर – फेस्ट ऑफ सेंट फ्रान्सिस झेवियर (Kanakadasa Jayanthi/Feast of St. Francis Xavier) (पणजीत बँका बंद)
    • 5 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
    • 11 डिसेंबर – शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)
    • 12 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
    • 18 डिसेंबर – यू सो सो थामची पुण्यतिथी (शिलाँगमध्ये बँका बंद)
    • 19 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
    • 24 डिसेंबर – ख्रिसमस सण (आयझॉलमध्ये बँका बंद)
    • 25 डिसेंबर – ख्रिसमस (बंगळुरू आणि भुवनेश्वर वगळता सर्व ठिकाणी बँका बंद) शनिवार, (महिन्याचा चौथा शनिवार)
    • 26 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
    • 27 डिसेंबर – ख्रिसमस सेलिब्रेशन (आयझॉलमध्ये बँका बंद)

    30 डिसेंबर – यू कियांग नोंगबाह (शिलॉन्गमध्ये बँका बंद)

    31 डिसेंबर – नवीन वर्षांची संध्याकाळ (आयझॉलमध्ये बँका बंद)

    Banks closed for 16 days in December

     

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले