विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बिहारमध्ये मतदार यादीत आढळले बांगलादेशी म्यानमारी आणि नेपाळी; पण शेतकरी आणि अल्पसंख्यांकांचे लेबल लावून काँग्रेस लढणार त्यांच्यासाठी!!, अशी बिहार राज्यातली अवस्था झाली आहे.Bangladeshis, Myanmaris and Nepalis found in the voter list in Bihar
निवडणूक आयोगाने बिहारमधल्या मतदार यादीचे पुनरिक्षण केले. त्यामध्ये निवडणूक आयोगाचे अधिकारी बूथ घरोघरी गेले. त्यांनी तिथे मतदारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली. पाच कोटी पेक्षा जास्त मतदारांनी कागदपत्रे सादर केली. पण या पडताळणी दरम्यान हजारो बांगलादेशी म्यानमारी आणि नेपाळी नागरिक यांनी भारतीय मतदार म्हणून नोंदणी केल्याचे आढळले. अर्थातच या नागरिकांची नावे मतदार यादीतून काढून टाकण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली. 30 सप्टेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात येणारे मतदार यादीतून बांगलादेशी, म्यानमारी आणि नेपाळी नागरिकांची नावे काढण्यात येतील, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले.
त्याबरोबर काँग्रेसच्या नेत्यांचे डोके फिरले. महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने आणि भाजपने साटेलोटे करून एक कोटी मतदार वाढविले. वाढीव मतदानातून भाजपला विजय मिळवता आला. आता बिहार मधून शेतकरी आणि अल्पसंख्याकांची नावे मतदार यादीतून वगळून तिथे विजय मिळवायचा भाजपचा डाव आहे. निवडणूक आयोग भाजपला सामील झालाय, असा आरोप काँग्रेसचे नेते प्रमोद तिवारी यांनी केला.
आम्ही निवडणूक आयोगाला शेतकरी आणि अल्पसंख्याकांची नावे मतदार यादीतून वगळू देणार नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत लढू. कारण भारतीय शेतकरी आणि अल्पसंख्यांक यांना मतदानाचा अधिकार आहे. त्यांना बांगलादेशी किंवा नेपाळी म्हणून तो निवडणूक आयोग काढून घेऊ शकत नाही, असा दावा प्रमोद तिवारी यांनी केला. बांगलादेशी म्यानमारी आणि नेपाळी नागरिकांना त्यांनी भारतीय शेतकरी आणि अल्पसंख्यांक असल्याचे लेबल लावले.
Bangladeshis, Myanmaris and Nepalis found in the voter list in Bihar; but Congress will fight for them by labeling them as farmers and minorities!!
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadanvis : जागतिक अर्थव्यवस्थेच्या नकाशावर लँडिंग करण्यासाठी नवी मुंबईहून टेक ऑफ!!
- आषाढी यात्रेच्या काळात एसटी महामंडळाला 35 कोटी रुपये उत्पन्न
- Chandrachud : वन नेशन-वन इलेक्शन विधेयक संविधानाविरुद्ध नाही; चंद्रचूड यांनी संसदीय समितीला सांगितले- ECच्या अधिकारांवर चर्चेची गरज
- Bangladesh : बांगलादेश लष्कराचा कट्टरपंथी पक्षांना पाठिंबा; हसीना यांचा पक्ष निवडणुकीच्या मैदानातून गायब