• Download App
    बांगलादेशच्या पंतप्रधान हसिना यांचा नोकर तब्बल 284 कोटींचा मालक; भ्रष्टाचाराची चौकशी सुरू|Bangladesh Prime Minister Hasina's servant owns as much as 284 crores; Corruption investigation underway

    बांगलादेशच्या पंतप्रधान हसिना यांचा नोकर तब्बल 284 कोटींचा मालक; भ्रष्टाचाराची चौकशी सुरू

    वृत्तसंस्था

    ढाका : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या नोकराकडे 284 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्याच्याकडे खासगी हेलिकॉप्टर आहे आणि ते कुठेही प्रवास करण्यासाठी तो वापरतो. ढाका ट्रिब्यूननुसार या नोकराचे नाव जहांगीर आलम होते. तो पंतप्रधान हसिना यांच्या घरी पाहुण्यांना पाणी द्यायचे काम करायचा.Bangladesh Prime Minister Hasina’s servant owns as much as 284 crores; Corruption investigation underway

    जहांगीरने हसीनांच्या कार्यालयात आणि घरात काम करत असल्याचे सांगून अनेक लोकांकडून लाच घेतली होती. काम करून देण्याच्या बहाण्याने तो लोकांकडून पैसे उकळायचा. हे प्रकरण समोर आल्यानंतर पंतप्रधान हसिना यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार जहांगीर आधीच अमेरिकेत पळून गेला आहे.



    बांगलादेशमध्ये माजी लष्करप्रमुख, पोलीस अधिकारी, कर अधिकारी आणि अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणे समोर आली आहेत. पंतप्रधानांच्या नोकराचेही नाव या यादीत आहे.

    ‘एवढं कमवायला एका सामान्य बांगलादेशीला 13 हजार वर्षे लागतील’

    पीएम हसीना म्हणाल्या, “माझ्या घरी काम करणारी व्यक्ती आज करोडोंच्या मालमत्तेची मालक आहे. त्याने एवढा पैसा कुठून कमवला? एका सामान्य बांगलादेशी व्यक्तीला एवढी मालमत्ता जमवायला 13 हजार वर्षे लागू शकतात. सरकारने यावर कारवाई करावी. या बाबींची गांभीर्याने चौकशी करत आहे.

    खरं तर, जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, 17 कोटी लोकसंख्या असलेल्या बांगलादेशात दरडोई उत्पन्न 2.11 लाख रुपये आहे. शेख हसीनांचा नोकर भ्रष्टाचारात गुंतल्याचे समोर आल्यापासून विरोधक सरकारला कोंडीत पकडत आहेत.

    बांगलादेशी नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) चे प्रवक्ते वहिदुझ्झमन म्हणाले की, हसीनांच्या नोकराकडे एवढा पैसा आहे, तर मालकाकडे किती पैसे आहेत याचा अंदाज लावता येणार नाही. त्यानंतरही या सेवकाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्याला नुकतेच नोकरीवरून काढून टाकण्यात आले.

    हसीना यांचे निकटवर्तीय भ्रष्टाचार प्रकरणात घेरले आहेत

    जानेवारीमध्ये पंतप्रधान हसिना चौथ्यांदा सत्तेवर आल्यापासून भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. बांगलादेशच्या लाचलुचपत प्रतिबंधक आयोगाने नुकतीच देशाच्या माजी राष्ट्रीय पोलीस प्रमुख बेनझीर अहमद यांच्याविरोधात चौकशी सुरू केली आहे.

    एकेकाळी हसीनांच्या जवळच्या असलेल्या बेनझीर यांच्यावर करोडोंची संपत्ती असल्याचा आरोप आहे, जी त्यांनी भ्रष्टाचारातून जमा केली आहे. अमेरिकेने 2021 मध्ये अहमदवर अनेक निर्बंधही लादले होते. अहमद यांच्यावर शेकडो लोकांच्या अचानक बेपत्ता होण्याच्या किंवा त्यांच्या हत्येच्या प्रकरणांमध्ये सामील असल्याचा आरोप होता.

    त्याचबरोबर बांगलादेशच्या स्थानिक वृत्तपत्रांनी देशाचे माजी लष्करप्रमुख अझीझ अहमद यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. हे अहवाल समोर आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक आयोगाने अझीझ यांच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या होत्या. याशिवाय त्यांची बँक खातीही गोठवण्यात आली आहेत.

    Bangladesh Prime Minister Hasina’s servant owns as much as 284 crores; Corruption investigation underway

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र