• Download App
    बांगलादेशचे गृहमंत्री म्हणाले - हिंदू मंदिरांवर हल्ले षडयंत्रानुसार; तर माहिती मंत्री म्हणाले - इस्लाम हा देशाचा धर्म नाही! । Bangladesh Home Minister says attacks on Hindu temples are part of conspiracy; The Information Minister said - Islam is not the religion of the country

    बांगलादेशचे गृहमंत्री म्हणाले – हिंदू मंदिरांवर हल्ले षडयंत्रानुसार; तर माहिती मंत्री म्हणाले – इस्लाम हा देशाचा धर्म नाही!

    वृत्तसंस्था

    ढाका : बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर हल्ल्यांच्या अनेक घटनांनंतर देशातील दोन मंत्र्यांनी दोन स्वतंत्र प्रसंगी निवेदने दिली आहेत. बांग्लादेशचे गृहमंत्री असदुद्झमान खान यांनी रविवारी सांगितले की, दुर्गापूजेच्या वेळी मंडपांवरील हल्ले पूर्वनियोजित होते आणि हे षडयंत्राचा भाग म्हणून केले गेले. त्याचबरोबर माहिती राज्यमंत्री मुराद हसन म्हणाले की, इस्लाम हा देशाचा धर्म नाही. Bangladesh Home Minister says attacks on Hindu temples are part of conspiracy; The Information Minister said – Islam is not the religion of the country

    असदुद्झमान खान मंदिरांवर झालेल्या हल्ल्याबद्दल म्हणाले की, बांग्लादेशमधील जातीय सलोखा नष्ट करणे हा त्यांचा हेतू आहे. बुधवारी कोमिला येथील हिंदू मंदिरात लोकांवर प्रथम हल्ला झाला. यानंतर शेकडो ज्ञात आणि अज्ञात लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. कोमिल्ला हल्ला का झाला, असे विचारले असता, मंत्री म्हणाले की, आम्हाला सर्व पुरावे मिळताच आम्ही ते सार्वजनिक करू आणि सर्व दोषींना शिक्षा करू, असे ढाका ट्रिब्यूनने म्हटले आहे.



    बांगलादेश एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, इस्लाम हा राष्ट्रीय धर्म नाही

    त्याचवेळी बांगलादेशचे माहिती राज्यमंत्री मुराद हसन म्हणाले की, बांगलादेश एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि आम्ही राष्ट्रपती बंगबंधू शेख मुजीबर रहमान यांच्या 1972 च्या संविधानाकडे परत येऊ. धार्मिक कट्टरपंथीयांसाठी बांगलादेश कधीही सुरक्षित आश्रयस्थान होऊ शकत नाही. मात्र, त्यांनी हे विधान मंदिरांवर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात केले नाही.

    बंगबंधू शेख मुजिबुर रहमान यांचे धाकटे पुत्र शेख रसाल यांच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त इन्स्टीट्यूट ऑफ इंजिनिअर्समध्ये बोलताना ते म्हणाले- “मला वाटत नाही की इस्लाम हा आपल्या देशाचा धर्म आहे. स्वातंत्र्य सैनिकांचे रक्त आमच्या शिरामध्ये वाहते आहे. काहीही करून 1972च्या संविधानाकडे परतावे लागेल. मी हा मुद्दा संसदेत मांडणार आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली हे विधेयक संसदेत मंजूर होईल.”

    13 ऑक्टोबरपासून मंदिरांवर हल्ले

    13 ऑक्टोबर रोजी बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर हल्ले सुरू झाले तेव्हा अष्टमीला मूर्ती विसर्जनाच्या निमित्ताने अनेक पूजा मंडपांची तोडफोड करण्यात आली. चितेगावच्या कोमिल्ला भागात दुर्गा पूजा मंडपावर झालेल्या हल्ल्यात चार जण ठार झाले. पूजा मंडपात कुराण सापडल्याची सोशल मीडियावर अफवा पसरली होती, त्यानंतर अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या. चांदपूर, चित्तगाव, गाझीपूर, बंदरबन, चापिनवाबगंज आणि मौलवीबाजारमध्ये अनेक धार्मिक स्थळांची तोडफोड करण्यात आली.

    Bangladesh Home Minister says attacks on Hindu temples are part of conspiracy; The Information Minister said – Islam is not the religion of the country

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार

    Anil Ambani : हवाला प्रकरणात अनिल अंबानी दुसऱ्यांदा गैरहजर; ऑनलाइन स्टेटमेंट देण्याची विनंती; 100 कोटींशी संबंधित हवाला प्रकरण