• Download App
    बांगलादेशातल्या हिंदूंच्या सुरक्षेची मोहम्मद युनूस यांची मोदींना हमी Bangladesh

    Bangladesh : बांगलादेशातल्या हिंदूंच्या सुरक्षेची मोहम्मद युनूस यांची मोदींना हमी; पण सगळ्या मूर्ती फोडून जिहादी राजवटीची हिफाजत ए इस्लामची तयारी!!

     

    नाशिक : बांगलादेशातल्या हिंदूंच्या सुरक्षेची मोहम्मद युनूस यांची मोदींना हमी; पण सगळ्या मूर्ती फोडून जिहादी राजवट आणायची हिफाजत ए इस्लाम संघटनेची तयारी!!, असला दुटप्पी कारभार नोबेल पुरस्कार प्राप्त मोहम्मद युनूस यांचे सरकार करत आहे. Hifajat e Islam wants Islamic state in Bangladesh

    बांगलादेशी नव्या राजवटीचा चेहरा जरूर मोहम्मद युनूस यांच्यासारखा नोबेल पुरस्कार विजेता उदारमतवादी आहे. परंतु, प्रत्यक्षात त्यांच्या सत्तेला जमाते इस्लामी, हिफाजत ए इस्लाम आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी या जिहादी संघटनांचा टेकू आहे. त्यामुळे बांगलादेशातील राजवट उदारमतवादाच्या बुरख्याखाली जिहादी बनली आहे. याचेच पडसाद बांगलादेशातल्या हिंसाचारात उमटले. विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली इस्लामी कट्टरतावाद्यांनी हिंदूंची हजारो घरी जाळली. शेकडो हिंदू महिलांवर बलात्कार केले. बांगलादेशात राहायचे असेल, तर खंडणी द्यावी लागेल असे धमक्यांचे फोन हिंदूंना केले. बांगलादेशातल्या हिंदूंवरच्या अत्याचाराविरोधात संपूर्ण जगभरातून आवाज उठल्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या उदारमतवादी प्रतिमेला धक्का बसला. त्यामुळे त्यांनी ढाक्यातल्या ढाकेश्वरी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तिथल्या हिंदूंच्या सुरक्षेची हमी घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून बांगलादेशातल्या सगळ्या परिस्थितीची माहिती दिली. हिंदू आणि बाकीच्या अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेची हमी मोहम्मद युनूस यांनी मोदींना दिली.

    हिफाजत ए इस्लामची दमबाजी

    पण यातून स्वतःच्या प्रतिमेची जपणूक किंवा प्रतिमा वर्धन करण्याची मोहम्मद युनूस यांनी दुसरे काही केल्याचे दिसले नाही. कारण त्यांनी मोदींना फोन केल्यानंतर हिंदूंना धमक्या सुरूच राहिल्या. उलट यात हिफाजत ए इस्लाम संघटनेच्या म्होरक्याने दिलेल्या धमकीची भर पडली. बांगलादेशात आम्हाला इस्लामी निजाम म्हणजे राजवट आणायची आहे. सरकारने बांगलादेशातल्या सर्व मूर्ती तोडून टाकाव्यात. इथल्या महिलांनी हिजाब वापरायला सुरुवात करावी. बांगलादेशातली राजवट शरियत आणि हदीसनुसार चालावी याची तयारी आम्ही करत आहोत, अशी खुलेआम धमकी हिफाजत ए इस्लाम संघटनेचा म्होरक्या अर्थात या संघटनेच्या भाषेनुसार नायब ए अमीर मोहीउद्दीन रब्बानी यांनी दिली. हिंदू समाजाविरोधात अत्याचाराचे सगळे स्क्रिप्ट याच रब्बानीने लिहिल्याचे मानले जात आहे. याच हिफाजत ए इस्लाम संघटनेचा दुसरा म्होरक्या अबुल फैयाज मोहम्मद खालिद हुसेन हा मोहम्मद युनूस सरकार मधला धार्मिक मामल्यांचा मंत्री आहे.


    Ramgiri Maharaj : मुस्लिम धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यनंतर रामगिरी महाराजांविरोधात 5 गुन्हे दाखल; संभाजीनगर-नगरमध्ये जमाव आक्रमक


    एका मुलाखतीत मोहीउद्दीन रब्बानी याने बांगलादेशातल्या इस्लामी राजवटीच्या इराद्याचे खुलेआम समर्थन केले. बांगलादेशच्या नव्या सरकारने देशभरातल्या सगळ्या मूर्ती तोडून टाकाव्यात मुली आणि महिलांनी हिजाब घालावा बांगलादेशातले सगळे कायदे शरियत आणि हदीस यांना अनुकूल करून घ्यावेत. बांगलादेशात संपूर्ण इस्लामी व्यवस्था प्रस्थापित व्हावी यासाठी आम्ही काम करतो आहोत, असे रब्बानी यांनी सांगितले.

    बांगलादेशात सर्वत्र शेख मजिबूर रहमान यांचे पुतळे आहेत, ते सरकारने तोडून टाकावेत. बांगलादेशाची निर्मिती जरी बंगाली भाषा, संगीत, कला या मुद्द्यांवर झाली असली तरी इस्लामी कायद्यांना मान्य असणाऱ्याच बाबी आम्ही पुढे चालू ठेवू. उगाच संगीत कला वगैरे गोष्टींना अनावश्यक महत्त्व देणार नाही. बांगलादेशाची राजवट इस्लामी कायद्यानुसारच चालेल, असे रब्बानी म्हणाले. हिंदू मंदिरांचे रक्षण करू, अशी त्यांनी जाता जाता पुस्ती जोडली.

    या मोहीउद्दीन रब्बानीने भारताविषयी देखील मुलाखतीत तारे तोडले. भारतात राज्यघटनेनुसार सरकार चालू आहे असे तुम्ही म्हणता. परंतु ते हिंदू राज्य आहे. तिथल्या हिंदूंना मला हे सांगायचे, की तुम्ही भारतातल्या मुस्लिमांबरोबर एकोप्याने राहा. जसे आम्ही बांगलादेशात मुस्लिम आणि हिंदू एकोप्याने राहतो, त्याच पद्धतीने भारतात मुस्लिमांचेही रक्षण व्हावे, असा “उपदेश” रब्बानीने भारतीयांना केला.

     दारुण वस्तुस्थिती

    पण रब्बानी यांच्या मुलाखती द्वारे बांगलादेशातील परस्परविरोधी दारुण वस्तुस्थिती देखील समोर आली. विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली जमाते इस्लामी हिफाजत ए इस्लाम आणि बांगलादेशी नॅशनॅलिस्ट पार्टी या कट्टरवादी संघटनांनी शेख हसीनांचे सरकार घालविले. त्यांना देशाबाहेर हाकलून दिले. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मदतीचा ओघ थांबू नये. बांगलादेशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर बिघडू नये यासाठी कट्टरवादी संघटनांनी मोहम्मद युनूस यांच्यासारखा उदारमतवादी आणि नोबेल पारितोषिक विजेता चेहरा सरकारला दिला. परंतु प्रत्यक्षात कट्टरतावादीच संघटनांच्या हातात सत्ता ठेवली आणि बांगलादेशात इस्लामी निजाम अर्थात राजवटीच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली, हीच दारुण वस्तुस्थिती समोर आली.

    Hifajat e Islam wants Islamic state in Bangladesh

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकिस्तानी लष्करप्रमुखाच्या हिंदू हेट स्पीच नंतरच पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; सर्जिकल आणि एअर स्ट्राइक पेक्षाही जबरदस्त तडाख्याची मोदी सरकारकडून अपेक्षा!!

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, अनेक पर्यटक जखमी

    DGP murder case : निवृत्त डीजीपी हत्या प्रकरणात मोठा खुलासा ; पत्नी ५ दिवसांपासून गुगलवर हत्येचा प्लॅन शोधत होती