• Download App
    Bangladesh Bans Hasina Statements Media NSCA Interpol Extradition Photos Videos Order बांगलादेशात हसीना यांचे वक्तव्य छापण्यास बंदी

    Bangladesh : बांगलादेशात हसीना यांचे वक्तव्य छापण्यास बंदी, सरकारने माध्यमांना दिला कडक इशारा

    Bangladesh

    वृत्तसंस्था

    ढाका :Bangladesh  बांगलादेशच्या अंतरिम सरकारने देशातील सर्व माध्यमांना (प्रिंट, टेलिव्हिजन आणि ऑनलाइन) कडक इशारा दिला आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की, माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी केलेले विधान प्रकाशित करू नये. सरकारने यामागे राष्ट्रीय सुरक्षेचे कारण असल्याचे सांगितले आहे.Bangladesh

    नॅशनल सायबर सिक्युरिटी एजन्सी (NCSA) ने सोमवारी एक प्रेस रिलीज जारी करून सांगितले की, शेख हसीना यांना आता गुन्हेगार आणि फरार घोषित करण्यात आले आहे. त्यांच्या वक्तव्यांमुळे हिंसाचार भडकू शकतो, अशांतता पसरू शकते आणि देशात सामाजिक सौहार्द बिघडू शकतो, असे या रिलीजमध्ये म्हटले आहे.Bangladesh



    दुसरीकडे, हंगामी सरकार आता हसीना आणि माजी गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल यांना देशात परत आणण्यासाठी इंटरपोलची मदत घेईल.

    आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाचे (आयसीटी) अभियोक्ता गाजी एमएच तमीम म्हणाले की, ते निकालाची प्रत आणि अटक वॉरंट परराष्ट्र मंत्रालयामार्फत इंटरपोलला पाठवतील. जेणेकरून त्यांना बांगलादेशात परत आणता येईल.

    हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेविरोधात बांगलादेश बंद

    बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बंदी घातलेल्या अवामी लीग पक्षाने त्यांना सुनावण्यात आलेल्या मृत्युदंडाच्या निषेधार्थ काल देशव्यापी बंदचे आवाहन केले आहे. अवामी लीगने ढाका येथील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण (ICT) च्या निकालाला पूर्णपणे नकार दिला आहे.

    पक्षाने अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस आणि मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. अवामी लीगचे नेते जहांगीर कबीर नानक यांनी पक्षाच्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि या निर्णयाला पक्षपाती आणि राजकीय सूडबुद्धी असल्याचे म्हटले. नानक यांनी न्यायालयाच्या प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी आरोप केला की,

    १४ ऑगस्ट रोजी खटला सुरू झाला आणि १७ नोव्हेंबर रोजी निकाल देण्यात आला.
    न्यायालयाने दोन महिन्यांच्या कालावधीत फक्त २० दिवस या खटल्याची सुनावणी केली.
    ८४ साक्षीदारांपैकी फक्त ५४ साक्षीदारांचे जबाब नोंदवले.
    सरन्यायाधीश महिनाभर अनुपस्थित होते, तरीही निकाल देण्यात आला.

    हत्येचा आदेश दिल्याबद्दल हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा

    हसीना यांना आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT) हत्येला चिथावणी देणे आणि हत्येचे आदेश देणे या आरोपाखाली मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. आयसीटीने तिच्यावर पाच प्रकरणांमध्ये आरोप लावले होते. उर्वरित प्रकरणांमध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

    जुलै २०२४ च्या विद्यार्थी निदर्शनांदरम्यान झालेल्या हत्याकांडांचा सूत्रधार शेख हसीना यांना लवादाने घोषित केले. दुसरे आरोपी, माजी गृहमंत्री असदुज्जमान खान यांनाही या हत्येमध्ये दोषी ठरवण्यात आले आणि त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा जाहीर होताच कोर्टात टाळ्यांचा कडकडाट झाला.

    तिसरा आरोपी, माजी आयजीपी अब्दुल्ला अल-मामुन, यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. मामुन अजूनही कोठडीत आहेत आणि ते साक्षीदार बनले आहेत. न्यायालयाने हसीना आणि असदुज्ज्झमान कमाल यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले. निकालानंतर, बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी हसीना यांना भारतातून हद्दपार करण्याची मागणी केली.

    Bangladesh Bans Hasina Statements Media NSCA Interpol Extradition Photos Videos Order

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Shivamogga : कर्नाटकातील शिवमोगा येथे धर्म विचारून तरुणावर हल्ला; हिंदू असल्याचे सांगितल्यावर मारहाण, 50,000 लुटले

    Al Falah Group : दिल्ली स्फोटप्रकरणी अल फलाह ग्रुपच्या सचिवाला अटक; खोटे दावे करून विद्यापीठाने कोट्यवधी उकळले

    TRAI : बनावट SMS आणि फसवणूक रोखण्यासाठी ट्रायचा नवा नियम; व्यावसायिक SMS साठी प्री-टॅगिंग अनिवार्य