वृत्तसंस्था
संगारेड्डी : आपण “बंगारू तेलंगणा”चे अर्थात “स्वर्णिम तेलंगणा”चे स्वप्न साकार केले. आता आपले पुढचे लक्ष्य “बंगारू भारत देशम” अर्थात “स्वर्णिम भारत देश” असे असले पाहिजे, अशा शब्दांमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव यांनी आपली राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाकांक्षा आज जाहीर केली. bangaroo telangana bharat desham
संगारेड्डी जिल्ह्यात एका जाहीर सभेत त्यांनी राष्ट्रीय राजकारणावर मोठे भाष्य केले. आपण बंगारू तेलंगणाचे स्वप्न साकार केले आहे. तेलंगणाचा ज्या पद्धतीने सर्वांगीण विकास केला सर्व समाजाला बरोबर घेऊन विकासाचे लाभ दिले त्याच पद्धतीने भारताला देखील आपण “बंगारू भारत” अर्थात “स्वर्णिम भारत” करायचा निश्चय केला आहे. तेलंगणाला राष्ट्रीय राजकारणामध्ये यापुढे फार मोठी भूमिका बजावायची आहे, असे चंद्रशेखर राव म्हणाले.
भारताला अमेरिकेपेक्षा विकसित देश करण्याचे आपले स्वप्न आहे. अनेक युवक अमेरिकेला आपल्या करिअरचे डेस्टिनेशन मानतात. यापुढच्या काळात भारत हे युवकांच्या करिअरचे डेस्टिनेशन असले पाहिजे, अशी ही महत्त्वाकांक्षा चंद्रशेखर राव यांनी बोलून दाखवली. भारतामध्ये उत्तम मनुष्यबळ आणि संपत्ती दोन्हीचा मिलाफ आहे. त्याचा वापर योग्य पद्धतीने करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
चंद्रशेखर राव यांच्या आजच्या वक्तव्याने ते तेलंगणाचा मॉडेलचा भारतभर प्रसार करू इच्छितात हे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर जाहीर सभेत त्यांनी प्रथमच आपल्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेचा उच्चार केला आहे. आपल्या मुक्त नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रीय पातळीवर सर्वांनी एकत्र येण्याचा मनसुबा बोलून दाखवला होता. आज तो त्यांनी जाहीररित्या सांगितला आहे.
bangaroo telangana bharat desham
महत्त्वाच्या बातम्या
- DISHA Salian Death : ह्या प्रकरणात राजकारण नाही ! दिशा सालियनच्या मृत्यूचे सत्य 7 मार्चनंतर बाहेर येईल ; चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा
- Hijab case HC live update : हिजाब ही आवश्यक धार्मिक परंपरा नाही ! वर्गात हिजाबला परवानगी नाहीच ; धर्मानुसार जर हिजाब अनिवार्य तर टिळा देखील अनिवार्यच…
- सुप्रीम कोर्टात पेगासस प्रकरणाची सुनावणी आता शुक्रवारी
- Himachal Factory blast : हिमाचल प्रदेशातील उनामध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 7 ठार, 10 जण गंभीर भाजले