• Download App
    दमदार : बेंगलोर विद्यापीठाच्या बायो-पार्कनेमधून मिळतो 16 हजार कोटींचा ऑक्सिजन Bangalore University produced oxygen worth 16k crore during Corona pandemic. About 450 hectare riparian forest along the Vrishabhavathi River is enriched with floral and faunal diversity in Bengaluru.

    दमदार : बेंगलोर विद्यापीठाच्या बायो-पार्कनेमधून मिळतो 16 हजार कोटींचा ऑक्सिजन

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन वेळेत न मिळाल्याने अनेक कोरोनाबाधितांना प्राण गमवावे लागले. प्राणवायू असलेल्या ऑक्सिजनचे महत्त्व नव्याने लोकांना समजले. त्यामुळेच आता अनेक ठिकाणी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांना महत्व येऊ लागले आहे. अशातच बंगळुरातून एका सुखद वार्तेची झुळूक आली आहे. Bangalore University produced oxygen worth 16k crore during Corona pandemic. About 450 hectare riparian forest along the Vrishabhavathi River is enriched with floral and faunal diversity in Bengaluru.


    वृत्तसंस्था

    बंगळुरू : कर्नाटकातील बेंगलोर विद्यापीठाच्या बायोपार्कची ओळख एक महत्त्वाची ऑक्सिजन बँक अशी झाली आहे. त्याचे कारणच तसे आहे. या बायोपार्कमधल्या सहा लाखांपेक्षा अधिक वृक्षांनी सुमारे 16 हजार 725 कोटी रुपयांचा ऑक्सिजन वातावरणात सोडला असल्याची माहिती एका अहवालातून पुढे आली आहे.

    शनिवारी (दि. 5) जगभर साजऱ्या झालेल्या पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर बंगळुरु विद्यापीठातल्या जैवविविधता उद्यानासंबंधीची ही दमदार बातमी आहे. विद्यापीठाच्या ज्ञान भारती परिसरातली अनोखी वृक्षराजी बंगळुरु शहरासाठी भूषण ठरली आहे.

    बंगळुरुतले उप वनसंरक्षक अधिकारी आणि जैवविविधता व्यवस्थापन समितीचे सदस्य रंगनाथनस्वामी यांनी सांगितले की, शाश्वत भविष्यासाठी या प्रकराची जैवविविधता उद्यानांची जपणूक केली पाहिजे. ते म्हणाले, “शहरांमधल्या या छोट्या जंगलांचे संवर्धन गरजेचे आहे. या जंगलांमध्ये कोणत्याही प्रकारच्या विकासकामांना तसेच अतिक्रमणांना थारा देता कामा नये.” कर्नाटक जैववैविध्य मंडळाचे सदस्य विजय निशांथ म्हणाले, “या अभ्यासाने अशा अनोख्या जैववैविध्य उद्यानांच्या जपणुकीची किती गरज आहे हे समोर आणले आहे. या उद्यानांमधली असंख्य वृक्षांचे प्रकार आणि त्यांच्यातली विविधताच या उद्यानांच्या संवर्धानाचे महत्त्व स्पष्ट करणारी आहे.”



    विशेष म्हणजे बंगळुरातल्या या जैववैविध्य उद्यानाच्या संवर्धनासाठी पर्यावरणप्रेमी सध्या लढा देत असतानाच या उद्यानाची महती वाढवणारा अहवाल समोर आला. त्यामुळे या पर्यावरणप्रेमींना निसर्गाच्या विरोधात असलेल्यांविरुद्धच्या लढाईत एक भक्कम हत्यार मिळाले आहे. कर्नाटक राज्य सरकारदेखील या उद्यानाच्या जागेतल्या 17 एकरांमध्ये सीबीएसई स्टडी सेंटर आणि आंतरविद्यापीठीय योगिक सायन्स अभ्यास केंद्र उभारू पाहात आहे. मात्र निसर्गप्रेमी संघटनांच्या विरोधानंतर ही योजना बारगळली. त्यानंतर या सुमारे साडेसहाशे एकर क्षेत्रावर पसरलेल्या जैववैविध्य उद्यान क्षेत्रातील सर्व बांधकामांना स्थगिती देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

    पर्यावरणीय विज्ञान विभागाच्या प्रोफेसर नंदिनी एन यांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे, “3 हजार विविध प्रजातींची सुमारे सहा लाख वृक्षराजी या साडेचारशे हेक्टर (सुमारे हजार एकर) क्षेत्रावर नांदत आहे. वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडचा निचरा करून वर्षाला तब्बल 7.07 कोटी लिटर ऑक्सिजन वातावरणात सोडणारे हे महत्त्वपूर्ण वनक्षेत्र आहे. वृषभावती नदीच्या काठावरील हे वनक्षेत्र फुलांच्या, पानांच्या आणि प्राण्यांच्या वैविध्याने समृद्ध आहे. निरोगी आयुष्य आणि शाश्वत भविष्यासाठी बंगळुरूतल्या अशा हिरवाईच्या जागांचे संरक्षण आवश्यक आहे.”

    Bangalore University produced oxygen worth 16k crore during Corona pandemic. About 450 hectare riparian forest along the Vrishabhavathi River is enriched with floral and faunal diversity in Bengaluru.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य