वृत्तसंस्था
त्राणवकोर : केरळच्या मंदिरांमध्ये RSS शाखेच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे. केरळमधील मंदिरांचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या त्रावणकोर देवस्वम बोर्डाने (TDB) सर्व 1248 मंदिरांना परिपत्रके जारी केली आहेत. मंदिरांमध्ये केवळ धार्मिक विधी आणि कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, असे सांगण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कोणत्याही राजकीय कार्याला किंवा शाखेला परवानगी देऊ नये असे यात म्हटले आहे.Ban on RSS branches in Kerala temples, Devaswam Board decree, opposition to political events too
आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे मंडळाने परिपत्रकात स्पष्ट केले आहे. खरेतर, मंडळाने 30 मार्च 2021 आणि 2016 रोजी परिपत्रके जारी केली होती, ज्यात RSS शाखा, शस्त्र प्रशिक्षण आणि मंदिर परिसरात सरावावर बंदी घालण्यात आली होती. आदेशानंतरही राज्यातील काही मंदिरांमध्ये आरएसएसचे कार्यक्रम होत असल्याचे बोर्डाच्या निदर्शनास आल्याने नव्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आदेशांचे पालन न करणाऱ्यांबद्दल TDB कडे तक्रार करा
देवस्वम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, केवळ आरएसएसच नाही, कोणत्याही संघटना किंवा राजकीय पक्षाला मंदिर परिसरात पूजाविधीशिवाय इतर कोणताही कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी दिली जाणार नाही. मंडळाच्या अधिकाऱ्यांना अशा उपक्रमांवर बंदी घालण्यासाठी पावले उचलण्यास आणि मुख्यालयाला अहवाल देण्यास सांगितले आहे.
त्यानंतरही मंदिरांमध्ये असे कार्यक्रम होत असतील तर सर्वसामान्यांनी मंडळाकडे तक्रार करावी असे म्हटले आहे.
काँग्रेसने म्हटले- केरळमधील 90% हिंदू आरएसएसच्या विरोधात
केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते व्हीडी सतीसन म्हणाले की केरळमधील जवळपास 90% हिंदू संघ परिवाराच्या विरोधात आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारची बंदी योग्यच आहे.
भाजपने म्हटले- मुख्यमंत्री कुटुंबाचे हित जपत आहेत
मुख्यमंत्री पिनारई विजयन यांनीही मंदिर परिसरात शाखांच्या शारीरिक प्रशिक्षणावरून आरएसएसवर टीका केली. मुख्यमंत्री पिनारई यांच्या या वक्तव्यावर भाजप केरळचे उपाध्यक्ष केएस राधाकृष्णन म्हणाले होते की, पिनारई यांना त्यांच्या कुटुंबीयांचे समाधान करायचे आहे. पिनारई हे त्यांचे जावई पीए मुहम्मद रियास यांच्या धार्मिक हिताचे रक्षण करण्याच्या प्रयत्नात बोलत आहेत.
Ban on RSS branches in Kerala temples, Devaswam Board decree, opposition to political events too
महत्वाच्या बातम्या
- नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर विरोधी पक्ष बहिष्कार टाकण्याची चिन्ह; TMC-CPI ने केली घोषणा
- पंतप्रधान मोदींच्या पदवीबाबत वक्तव्यावरून केजरीवालांच्या अडचणी वाढल्या, गुजरात कोर्टाने जारी केले समन्स
- राहुल गांधींनी नवीन पासपोर्टसाठी ठोठावला न्यायालयाचा दरवाजा, एनओसी देण्याची केली विनंती
- सावरकर पोर्ट्रेट ते सावरकर जयंती दिनी नव्या संसद भवनाचे उद्घाटन; लोकशाहीचा डंका पिटणाऱ्या विरोधकांच्या बहिष्काराचा असहिष्णू पायंडा!!