• Download App
    रजा अकादमीवर बंदी घाला, विश्व हिंदू परिषदेची मागणीBan on Reza Academy, demand of Vishwa Hindu Parishad

    रजा अकादमीवर बंदी घाला, विश्व हिंदू परिषदेची मागणी

    महाराष्ट्रातील काही शहरांत नियोजनबद्ध पद्धतीने हिंसाचार झाला. या संबंध घटनाक्रमामागे रजा अकादमी व अन्य सहा संघटना आहेत. रजा अकादमीवर निर्बंध घालून, पीडितांची नुकसानभरपाई त्यांच्याकडून वसूल केली जावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद परांडे यांनी केली. रविवारी ते धंतोली येथील विहिंपच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.Ban on Reza Academy, demand of Vishwa Hindu Parishad


    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : महाराष्ट्रातील काही शहरांत नियोजनबद्ध पद्धतीने हिंसाचार झाला. या संबंध घटनाक्रमामागे रजा अकादमी व अन्य सहा संघटना आहेत. रजा अकादमीवर निर्बंध घालून, पीडितांची नुकसानभरपाई त्यांच्याकडून वसूल केली जावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद परांडे यांनी केली. रविवारी ते धंतोली येथील विहिंपच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.

    त्रिपुरा येथील घटनेला उचलून धरत रजा अकादमी व अन्य सहा संघटनांनी अमरावती, मालेगाव, नांदेड शहरात मोर्चा काढत हिंदूंची घरे, व्यापारी प्रतिष्ठानांवर पोलिसांच्या देखत हल्ला बोलला. अचानक झळकलेले बॅनर्स आणि सोशल मीडियावरील संदेशांवरून या घटना पूर्णत: सुनियोजित होत्या.


    बांगलादेशातील हिंदूंचे हत्याकांड संतापजनक, शांतीसेना पाठविण्याची विहिंपची मागणी


     

    मात्र, यावेळी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. शासन-प्रशासन आपल्या सुरक्षेत हयगय करीत असल्याचे दिसून येत असल्याने नागरिकांनी मोर्चा काढला. मात्र, गुन्हेगारांना सोडून पीडितांवरच पोलिसांनी लाठीचार्ज केला, असा आरोप परांडे यांनी केला.

    Ban on Reza Academy, demand of Vishwa Hindu Parishad

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    BJP Government : रामनवमीपूर्वी बिहारमध्ये भाजप सरकार; JDUच्या दोन उपमुख्यमंत्रांसह 32 मंत्री शपथ घेऊ शकतात

    Karnataka : कर्नाटक मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालणार; असे करणारे देशातील पहिले राज्य, पालकांची परवानगी आवश्यक

    Iranian Warship : इराणची एक युद्धनौका भारतात असल्याचा दावा, 183 खलाशी उपस्थित, तांत्रिक बिघाडानंतर मागितली मदत