विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेतील बलाढ्य उद्योगपती अनिल अंबानी यांचे दिवस अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहेत. आता बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. यासोबतच ‘सेबी’ने रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडवरही बंदी घातली आहे. Ban on Reliance Home Finance Limited
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सेबी’ने शुक्रवारी रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड, उद्योगपती अनिल अंबानी आणि इतर तीन व्यक्तींवर कंपनीशी संबंधित कथित फसवणूकीबद्दल रोखे बाजारातून बंदी घातली. अमित बापना, रवींद्र सुधाकर आणि पिंकेश आर शहा या तीन व्यक्तींवर ‘सेबी’ने कारवाई केली आहे.
Ban on Reliance Home Finance Limited
- एसटी संप चिघळविण्याचा आघाडी सरकारचा सुनियोजित कट, गोपीचंद पडळकर यांचा आरोप
- कॉँग्रेससाठी हा राहूल काळ, नेते पक्ष सोडून जात आहेत, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप
- तृणमूलच्या नेत्यांचे सोशल मीडिया चालवित होते आय-पॅकचे पगारी नोकर, प्रशांत किशोर यांचे ममतांशी मतभेद झाल्यावर उघड
- ‘राहुल गांधी हे राजीव गांधी यांचे पुत्र आहेत याचा पुरावा आम्ही कधी मागितला का? मुख्यमंत्र्यांचा वादग्रस्त सवाल