• Download App
    उत्तर प्रदेशांत सभांवर बंदी घाला, विधानसभा निवडणुकाही पुढे ढकला, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे पंतप्रधानांना आवाहन|Ban on rallies in Uttar Pradesh, postpone assembly polls, Allahabad High Court appeals to PM

    उत्तर प्रदेशांत सभांवर बंदी घाला, विधानसभा निवडणुकाही पुढे ढकला, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे पंतप्रधानांना आवाहन

    विशेष प्रतिनिधी

    अलाहाबाद : उत्तप्रदेशात सभांवर बंदी घाला असे इतकेच नाही तर विधानसभा निवडणुकाही पुढे ढकला असे आवाहन अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकांचे काय होणार? अस प्रश्न उपस्थित झाला आहे.Ban on rallies in Uttar Pradesh, postpone assembly polls, Allahabad High Court appeals to PM

    देशात सध्या ओमिक्रॉनचे संक्रमण वाढत आहे. त्यातच अनेक राज्यांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. यावरून हायकोर्टनं मोदींना रॅलींवर बंदी लावण्याचे तसेच आता होणारी निवडणूक तुतार्तास टाळण्याचे आवाहन केले आहे.



    कोरोनाच्या संभाव्य तिसºया लाटेचा धोका जसा जगाला आहे, तसाच भारतालाही आहे. उत्तर प्रदेश उच्च न्यायालयात न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांच्या खंडपीठासमोर एका जामीनाच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. यावेळी कोटार्तील गर्दी पाहून कोटार्ने मोदींना हे आवाहन केले आहे.

    न्यायालयाने म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींनी निवडणूक रॅली आणि सभांवर बंदी घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. निवडणुकीचा प्रचार टीव्ही आणि वर्तमानपत्रांच्या माध्यमातून करावा. तसेच मोदींनी निवडणुका तहकूब करण्याबाबतही विचार करावा .

    या खंडपीठाने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेवरून पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. कोटार्ने आपल्या आदेशात म्हटले आहे की, विशाल लोकसंख्या असलेल्या या देशात पंतप्रधानांनी लसीकरण अभियान जोमाने चालवले आहे.

    कोर्ट याचे कौतुक करत आहे. त्याचबरोबर उच्च न्यायालय ठोस पावले उचलून प्रचासभा आणि रॅलींवर बंदी घालण्याचेही आवाहन करत असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर कोटार्ने जीव आहे तर जग आहे, असेही म्हटले आहे.

    Ban on rallies in Uttar Pradesh, postpone assembly polls, Allahabad High Court appeals to PM

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!