• Download App
    राष्ट्रनिर्माते म्हणत अत्याचारी मुघलांचे कौतुक करणाऱ्या कबीर खानच्या द एम्पायर वेबसिरीजवर बंदी घाला|Ban on Kabir Khan's The Empire webseries praising oppressive Mughals, Bjp Mla Ram Kadam demands

    राष्ट्रनिर्माते म्हणत अत्याचारी मुघलांचे कौतुक करणाऱ्या कबीर खानच्या द एम्पायर वेबसिरीजवर बंदी घाला

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: मुघल हे खरे राष्ट्रनिर्माते होते. मुघलांना चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिकेत पाहून आपल्याला त्रास होतो असं बॉलिवूड दिग्दर्शक कबीर खानने म्हटलं होते. यावरून वाद सुरु झाला असून भाजपा आमदार राम कदम यांनी कबिर खान याच्या द एम्पायर या वेबसिरीजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.Ban on Kabir Khan’s The Empire webseries praising oppressive Mughals, Bjp Mla Ram Kadam demands

    यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये कदम यांनी म्हटले आहे की, कबीर खान यांची द एम्पायर नावाची वेबसिरीज येत आहे. जे अत्याचारी मुघल बादशहाचे कौतुक करणारी आहे, या वेबसिरीजवर बंदी घालायला हवी. दिग्दर्शक कबीर खानने अत्याचारी मुघल बादशाह बद्दल कौतुकाने केलेले विधान त्वारित मागे घ्यावे.



    दिग्दर्शक कबीर खान याने मुघल साम्राज्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. मुघलांना कमी लेखणारे चित्रपट पाहणे हे लज्जास्पद वाटते असं कबीर खान याने म्हटले होते. हिंदी चित्रपटांमध्ये लोकप्रिय कथानकानुसार हे चित्रपट बनवले जातात. ते ऐतिहासिक संदर्भांवर आधारित नसतात असा आक्षेपही कबीर खानने घेतला होता. मुघलांना चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिकेत पाहून आपल्याला त्रास होतो.

    ज्या आक्रमणकारी मुघलांनी आपल्या भारतावर आक्रमण करुन रक्तपात करत लुटमार केली. लोकांवर अत्याचा करत छळ केला. त्या मुघलांची प्रशंसा स्तुती करत त्याच्यावर वेब सीरिज बनवण्याचं धैर्य निर्माते कबीर खान करत आहेत. त्यांच्या बुद्धीची कीव येते. ते या मुघल बादशहांचा भारताच्या निर्मितीमध्ये आणि देशहितामध्ये फार मोठा वाटा आहे असे म्हणत आहेत.

    तैमुर आणि चंगेज खानचा वंशच बाबर आणि त्याच्या नंतरचे औरंगजेबापर्यंत मुघल बादशहा यांचा रक्तपात ना इतिहास विसरला आहे ना लोक विसरले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्यावर वेबसिरिज बनवा आम्ही स्वागत करु. पण हिंदू धर्मीयांचा अपमान होईल त्यांच्या भावना दुखावल्या जातील अशा प्रकारच्या वेब सिरिजवर कायमची बंदी घालावी ही आमची मागणी आहे, असे राम कदम यांनी म्हटले आहे.

    Ban on Kabir Khan’s The Empire webseries praising oppressive Mughals, Bjp Mla Ram Kadam demands

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    S Jaishankar : SCO बैठक, जयशंकर यांनी मॉस्कोमध्ये पुतीन यांची घेतली भेट, परराष्ट्र मंत्री म्हणाले- आम्ही आमच्या लोकांच्या संरक्षणासाठी प्रत्येक पाऊल उचलू

    Dr. Umar Suicide : दहशतवादी डॉ. उमर आत्मघाती बॉम्बर तयार करत होता; 11 तरुणांच्या ब्रेनवॉशसाठी 70 व्हिडिओ पाठवले

    2026 पर्यंत बद्रीनाथ स्मार्ट आध्यात्मिक शहर बनणार; ₹481 कोटी खर्च, PMO करत आहे मॉनिटरिंग