• Download App
    दिल्लीत यंदाच्या दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी नाही, सरकारची बंदी । Ban on fircrackers in Delhi - Kejariwal

    दिल्लीत यंदाच्या दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी नाही, सरकारची बंदी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : प्रदूषणाचे संकट टाळण्यासाठी दिल्ली सरकारने यंदाच्या दिवाळीत राजधानी परिसरात फटाके उडविण्यावर संपूर्ण बंदी घालण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी फटाक्यांच्या विक्रीवर आणि साठा करण्यावरही बंदी घालणार असल्याचे सांगितले. Ban on fircrackers in Delhi – Kejariwal

    दिल्लीत दरवर्षी दिवाळीत धुराच्या प्रदूषणाने श्वास घेणेही कठीण बनते हा वर्षानुवर्षाचा अनुभव आहे. पंजाब व हरियानातील शेतकरी याच काळात शेतात काडीकचरा (पराली) जाळतात व त्याचा धूर थेट दिल्लीकरांचा श्वास आवळतो. त्यामुळेच केजरीवाल यांनी यंदा फटाकाबंदीचे अस्त्र उगारले आहे. त्यांनी आज सलग ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली.



    लोकांचे जीव वाचविणे महत्त्वाचे असल्याने यंदा फटाक्यांची खरेदी-विक्री, साठवणूक व फटाके फोडणे या सर्वांवर यंदा दिवाळीच संपूर्ण बंदी राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. केजरीवाल यांनी मागील ३ वर्षांतील घातक प्रदूषण पातळीची उदाहरणेही दिली आहेत. मागील वर्षी दिल्लीत फटाके साठवून ठेवण्यास व्यापाऱ्यांना प्रतिबंध करण्यात आला होता. आता फटाक्यांवर पूर्ण बंदी असेल हेही त्यांनी स्पष्ट केले.

    Ban on fircrackers in Delhi – Kejariwal

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये