• Download App
    पाकिस्तानात हिंसाचाराला जबाबदार असलेल्या कट्टरवादी पक्षावर बंदी Ban on extremist party responsible for violence in Pakistan

    पाकिस्तानात हिंसाचाराला जबाबदार असलेल्या कट्टरवादी पक्षावर बंदी

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये हिंसाचाराच्या घटनेला जबाबदार असलेला कट्टरवादी पक्ष तहरीक-ए-लब्बॅक पाकिस्तान (टीएलपी) वर दहशतवादी कलमाखाली बंदी घातली आहे. गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी याबाबतची घोषणा केली. Ban on extremist party responsible for violence in Pakistan

    गेल्या काही महिन्यांपासून फ्रांसच्या राजदूताला पाकिस्तानातून बाहेर काढण्याची मागणी टीएलपीचे कार्यकर्ते करत आहेत. त्यासाठी निदर्शन केली आहेत. या प्रकरणी मंगळवारी टीएलपीचे अध्यक्ष साद रिजवी यांना पोलिसांनी अटक केली, त्यानंतर पाकिस्तानात तीन दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. त्या हिंसाचारात 7 पोलिसाची हत्या तर 300 जखमी झाले.



    टीएलपीने 12 कार्यकर्ते मारले गेल्याचा दावा केला आहे. या तणावानंतर लाहोरमध्ये सुरक्षादलाच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. दुसरीकडे टीएलपीच्या कार्यकर्त्यांनी रस्ते रोखून धरले आहेत. यामुळे 800 हून अधिक भारतीय शीख तेथे अडकून पडले आहेत.

    शीख बांधव अडकले?

    सोमवारी ( ता. 12 ) बैसाखी साजरी करण्यासाठी 815 शिखांचा एक गट वाघा-अटारी सीमेवरून पाकिस्तानात दाखल झाला. तिथे गुरुद्वारा पंजा साहिबचे दर्शन घेण्यासाठी ते गेले आहेत. पाकिस्तानी सरकारच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की मंगळवारी 25 बसमधून शीख बांधवांचा गट गुरुद्वारा पंजा साहिब येथे जाण्यासाठी निघाला, मात्र याच दरम्यान हिंसाचार वाढल्याने रस्ते बंद केले आहेत. यामुळे शीख लाहोरमध्येच अडकले आहेत.

    Ban on extremist party responsible for violence in Pakistan

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते