वृत्तसंस्था
तिरूअनंतपूरम : बकरी ईद वर निर्बंध न लादलेल्या केरळमध्ये सार्वजनिक ठिकाणी मंदिरांमध्ये बाली तर्पण वर बंदी घालण्यात आली आहे. अनेक मंदिरांनी ही बंदी स्वीकारली आहे. परंतु दोन धर्मांच्या धार्मिक कृत्यांमधल्या भेदभावाबद्दल नाराजी देखील व्यक्त केली आहे. Ban on Bali Tarpan in public places, temples in Kerala without restrictions on Goat Eid
केरळच्या सरकारने बकरी ईद सणावर सार्वजनिकरीत्या बंदी घातली नव्हती. त्यावेळी सुप्रीम कोर्टात जाऊन ही बंदी आणावी लागली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार केरळच्या डाव्या सरकारने कोविल प्रोटोकॉल नुसार बकरी ईद साजरी करावी, असे आदेश काढले होते.
आज दीप अमावस्या आहे. केरळमध्ये “कारकिडाका वाहू” म्हणजे दीप अमावस्या पाळली जाते. या दिवशी लोक आपल्या पूर्वजांना मंदिरांमध्ये जाऊन सार्वजनिकरित्या किंवा घरी बाली तर्पण करून श्रद्धांजली वाहतात.
मात्र केरळच्या डाव्या सरकारने या बाली तर्पण वर सार्वजनिक बंदी आणली आहे. बाली तर्पण कोविड प्रोटोकॉल पाळून घरातच करावे, असे आदेश काढले आहेत. केरळमधील विविध मंदिरांमध्ये तशा सूचना सरकारने लावल्या आहेत. यातून एक प्रकारे केरळचे डावे सरकार हिंदू आणि मुस्लिमांच्या धार्मिक प्रथांमध्ये कसा भेदभाव करते हे दिसून आले आहे.
Ban on Bali Tarpan in public places, temples in Kerala without restrictions on Goat Eid
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परतणार नाहीत देशात
- सीमावादावर तोडग्यासाठी समित्या स्थापण्याचा आसाम, मेघालय सरकारचा निर्णय
- लाल किल्ला कडकोट, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यासमोर उभारली कंटेनरची तात्पुरती भिंत
- अफगाणिस्तानच्या २२३ जिल्ह्यांवर तालिबानचे वर्चस्व, सहा महिन्यात दीड हजार नागरिक मृत्युमुखी
- भारत आणि चीनच्या सैन्याची गोगरा भागातून माघारी, पुन्हा घुसखोरी न करण्याची चीनची ग्वाही