वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्र सरकारने गुरुवारी अश्लील कंटेंट प्रसारित करणाऱ्या 18 OTT प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. यासोबतच 19 वेबसाइट, 10 ॲप्स आणि 57 सोशल मीडिया हँडलही ब्लॉक करण्यात आले आहेत.ban on 18 OTT platforms displaying obscene content; The government also blocked 19 websites, 10 apps and 57 social media handles
हे ॲप्स, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाच्या नावाखाली अश्लील आणि आक्षेपार्ह व्हिडिओ सादर करण्यात येत होते. याआधी, या OTT ॲप्सना अनेक वेळा इशारा देण्यात आला होती, परंतु त्यांच्या कंटेंटमध्ये कोणतीही सुधारणा करण्यात आली नव्हती.
12 मार्च रोजी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, 14 मार्च रोजी या ॲप्सची यादी जाहीर करण्यात आली.
1 कोटींहून अधिक डाउनलोड, 32 लाखांहून अधिक फॉलोअर्स
सरकारने सांगितले की, 18 OTT ॲप्सपैकी एका ॲपला 1 कोटींहून अधिक डाउनलोड मिळाले आहेत. मात्र, त्याचे नाव सांगण्यात आलेले नाही. गुगल प्ले स्टोअरवर आणखी दोन ॲप्सना 50 लाखांहून अधिक डाउनलोड मिळाले आहेत. याशिवाय, या OTT प्लॅटफॉर्मने प्रेक्षकांना त्यांच्या वेबसाइट्स आणि ॲप्सकडे आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. या सोशल मीडिया अकाउंटवर एकूण 32 लाखांहून अधिक युजर्स आहेत.
अनेक तक्रारी आल्यानंतर कारवाई
याआधी मंत्रालयाने सांगितले होते की, त्यांना OTT प्लॅटफॉर्मवर दाखवल्या जाणाऱ्या कंटेंटबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. याबाबत तक्रार करणाऱ्यांमध्ये अनेक खासदार/आमदार, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश होता. या तक्रारींचा विचार केल्यानंतर, OTT प्लॅटफॉर्मच्या कंटेंटवर लक्ष ठेवण्यासाठी या वर्षी नवीन नियम, माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया एथिक्स कोड) नियम, 2021 आणण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या कायद्याच्या कलम 67, 67A आणि 67B मध्ये अशी तरतूद आहे की सरकार आक्षेपार्ह कंटेंटवर बंदी घालू शकते.
सोशल मीडियावर ॲपमध्ये अश्लील कंटेंटचा प्रचार
ॲपवर दाखवण्यात आलेल्या मालिकेतील काही दृश्यांचा आणि कथांचा व्हिडिओ बनवला जातो आणि त्याचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट केला जातो. ॲप डाउनलोड करण्याची लिंक व्हिडिओसोबत राहते. अशा ॲप्सवर येणारे बहुतेक वापरकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून येतात.
ban on 18 OTT platforms displaying obscene content; The government also blocked 19 websites, 10 apps and 57 social media handles
महत्वाच्या बातम्या
- भाजपने मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, हरियाणा राज्ये केली पुढच्या पिढीसाठी “मोकळी”; सर्व माजी मुख्यमंत्री उतरवले लोकसभेच्या मैदानात!!
- मुख्तार अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा ; न्यायालयाने आर्म्स ॲक्ट अंतर्गत दिला निकाल
- महाराष्ट्रात फारशा भाकऱ्या फिरवल्या नाहीत; रणजीत सिंह निंबाळकर, संजय काका पाटील, सुभाष भामरे, रक्षा खडसे यांची तिकिटे भाजपने टिकवली!!
- महाराष्ट्राच्या पहिल्या यादीत गडकरी, पंकजा मुंडे, पियुष गोयल; खासदारांची तिकिटे कापण्याच्या माध्यमांच्या बातम्या ठरल्या खोट्या!