सोशल मीडियावर सध्या मराठी अभिनेत्रींनी सुरु केलेला #Banlipstick हा ट्रेंड सध्या चर्चेचा विषय बनला आहे. तेजस्विनी पंडीत, प्राजक्ता माळी, सोनाली खरे या सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या अभिनेत्रींनी आपला एक व्हिडीओ तयार करत सर्वांची उत्सुकता वाढवली आहे.BAN LIPSTICK: NO BINDI NO BUSINESS after the #Banlipstick trend on social media; Video shared by Prajakta Mali, Tejaswini Pandit
विशेष प्रतिनिधी
मुंबई:सोशल मीडियावर नुकताच एक ट्रेंड प्रचंड गाजला NO BINDI NO BUSINESS . आता अभिनेत्री तेजस्विनी पंडितने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही, बॅन लिपस्टिक’ असं ती या व्हिडीओत म्हणताना दिसतेय. त्यानंतर #BANLIPSTICK ट्रेंड सुरू झाला आहे .
मात्र ती असं का म्हणतेय, हाच प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. या व्हिडीओत तेजस्विनी तिच्या ओठांना लावलेली लिपस्टिकही पुसून टाकते. कॅप्शनमध्ये #BanLipstick असा हॅशटॅग देत तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी तिला प्रश्न विचारले आहेत.
दुसरीकडे अभिनेत्री प्राजक्ता माळीनेदेखील #BanLipstick हा हॅशटॅग वापरत व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओला कॅप्शन लिहिली आहे,”मला लिपस्टिकचा रंग नको…मी लिपस्टिकला सपोर्ट करत नाही. बॅन लिपस्टिक!”.
अभिनेत्री सोनाली खरेनेदेखील लिपस्टिक पुसतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले आहे,”माझा लिपस्टिकला विरोध आहे. बॅन लिपस्टिक”. प्रत्येक अभिनेत्रीने व्हिडीओच्या शेवटी आपली लिपस्टीक स्वतःच्या हाताने पुसून टाकली आहे. तर काही चाहत्यांना हा व्हिडीओ म्हणजे तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनचा एक भाग असल्याचे वाटत आहे.
तुर्तास हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून चाहत्यांच्या नजरा वेधून घेत आहेत. व्हिडीओवर चाहतेही वेगवेगळ्या कमेंट्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. एका युजरने म्हटलंय ”मग लावलीच कशाला???🤔🤔 आणि लावायची होती तर पुसलीच कशाला??? काहीही करतात लोकं”,”
एखादा नवीन चित्रपट येत असेल…..प्रमोशन साठी काहीपण 😂😂😂”,”आता हा काय नवीन ट्रेंड😂” या सगळ्या कमेंट्स वाचून तुम्हालाही लक्षात आले असे की, चाहते या व्हिडीओमागाचे उद्देश जाणून घेण्यात फार उत्सकु आहेत.
BAN LIPSTICK: NO BINDI NO BUSINESS after the #Banlipstick trend on social media; Video shared by Prajakta Mali, Tejaswini Pandit
महत्त्वाच्या बातम्या
- PARMBIR SINGH : ED ने नोंदवला परमबीर सिंग यांचा जबाब
- NASHIK : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कोरोनाचा शिरकाव ; सापडले दोन रूग्ण
- 50,000 नोकऱ्या कुठे? केंद्रशासित प्रदेशाकडे तुम्ही फक्त पर्यटनाच्या दृष्टीनेच पाहणार का? जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा परत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांप्रमाणेच त्याग करू ; नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला
- इंदिराजींनी घोषणा दिली गरीबी हटाव; पण काँग्रेसने गरीबच आठवडा हटवला; अमित शहा यांचा हल्लाबोल