विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – मुस्लिम युवकांना दहशतवादी कृत्यांसाठी चिथावणी दिल्याप्रकरणी झाकिर नाईक याच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) या संस्थेवर घातलेली बंदी पाच वर्षांनी वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.Ban extended on Zakir Nikes Islamic Foundation
ढाकामध्ये २०१६ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर नाईकने परदेशात पलायन केले. सध्या तो मलेशियात आहे. ब्रिटन व कॅनडाने व्हिसा नाकारल्यानंतर झाकिर नाईकला मलेशियाने आश्रय दिला आहे. तो आता मलेशियाचा कायमस्वरूपी रहिवासी असून त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती भारताने मलेशियाला केली आहे.
आपल्या ‘पीस टीव्ही’ या वाहिनीमार्फत व सोशल मीडियावरून विविध समुदायांत तेढ निर्माण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये २०१६ मध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात २० जण ठार झाले होते. नाईकच्या भाषणामुळे प्रभावित होऊन हा बॉम्बस्फोट घडविल्याची कबुली हल्लेखोराने दिली होती.
त्यानंतर, केंद्र सरकारने १७ नोव्हेंबर २०१६ मध्ये बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्यानुसार नाईकच्या आयआरएफ या संस्थेवर बंदी घातली होती. ही बंदी आणखी पाच वर्षांनी वाढविण्याची अधिसूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी रात्री जारी केली.
Ban extended on Zakir Nikes Islamic Foundation
महत्त्वाच्या बातम्या
- जागतिक महासत्ता अमेरिका व चीनच्या अध्यक्षांची तब्बल तीन तास चर्चा
- खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यावर एसटी कामगारांच्या संपामुळे उपासमारीची वेळ; प्रवाशांनाही फटका
- आम्ही ठाकरे सरकारच्या राज्यात होत असलेली हिंदूंची अवहेलना थांबविणार ; किरीट सोमय्यांचा यशोमती ठाकूर यांच्यावर घणाघात
- अभिनेता सुशांतसिंहचे सहा नातेवाईक बिहारमध्ये भीषण अपघातात ठार
- कंगना – राहुल “वैचारिक मैत्रभाव”!!