• Download App
    बालासोर रेल्वे अपघात : सीबीआयच्या आरोपपत्रात 3 अधिकाऱ्यांची नावे; 7 जुलैला अटक|Balasore train accident: 3 officers named in CBI charge sheet; Arrested on July 7

    बालासोर रेल्वे अपघात : सीबीआयच्या आरोपपत्रात 3 अधिकाऱ्यांची नावे; 7 जुलैला अटक

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर येथे 2 जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात सीबीआयच्या आरोपपत्रात तीन रेल्वे अधिकाऱ्यांची नावे आहेत. तिघांवरही सदोष मनुष्यवध आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. यामध्ये वरिष्ठ विभाग अभियंता अरुणकुमार मोहंता, विभाग अभियंता मोहम्मद अमीर खान आणि तंत्रज्ञ पप्पू कुमार यांचा समावेश आहे. 7 जुलै रोजी सीबीआयने तिन्ही आरोपींना अटक केली. 11 जुलै रोजी न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. या रेल्वे अपघातात 293 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता तर 1200 हून अधिक लोक जखमी झाले होते.Balasore train accident: 3 officers named in CBI charge sheet; Arrested on July 7



    त्यांच्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊ शकतो हे तिन्ही आरोपींना माहीत होते – सीबीआय

    सीबीआयने जुलैमध्ये सांगितले होते की, या तिघांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला. तपास एजन्सीने असा दावाही केला होता की, तीन आरोपींना माहिती होते की त्यांच्या निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते.

    रेल्वे सुरक्षा आयुक्त (CRS) यांनी अपघाताची चौकशी करत जुलैच्या सुरुवातीच्या आठवड्यात सिग्नलिंग विभागातील कर्मचार्‍यांवर मानवी चुकांना जबाबदार धरले होते.

    बालासोर दुर्घटनेचे कारण मंजुरीशिवाय ट्रॅक दुरुस्ती : सीबीआय

    सीबीआयने 24 ऑगस्ट रोजी भुवनेश्वरच्या विशेष न्यायालयात आपला अहवाल सादर केला. त्यात तपास यंत्रणेने सांगितले की, मंजुरीविना ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने रेल्वे अपघात झाला.

    यापूर्वी बहनगा बाजार स्थानकाच्या लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक 94 येथे मंजुरीविना दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. सीबीआयने सांगितले की, तेथे दुरुस्तीचे काम वरिष्ठ विभागीय सिग्नल आणि दूरसंचार अभियंत्यांच्या मान्यतेशिवाय करण्यात आले. त्यासाठी सर्किट डायग्रामही पास करण्यात आलेला नव्हता.

    Balasore train accident: 3 officers named in CBI charge sheet; Arrested on July 7

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य