विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने पुलवामा हल्याचा बदला घेण्यासाठी केलेल्या बालाकोट एअर स्ट्राईकमधील हिरो विंग कमांडर अभिनंदन यांना ग्रुप कॅप्टन पदावर बढती मिळाली आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्यातील कामगिरीसाठी अभिनंदन यांना वीरचक्र प्रदान करण्यात आले होते.Balakot Air Strike’s Hero Wing Commander Abhinandan promoted to Group Captain
अत्याधुनिक मानल्या जाणाऱ्या एफ-१६ विमानांना मिग-२१ विमानातून पाडणारे अभिनंदन हे एकमेव पायलट आहेत.बालाकोट एअर स्ट्राईक नंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये अभिनंदन यांचे विमान शत्रुने पाडले होते. त्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना ताब्यात घेतला. मात्र, येथेही त्यांनी आपल्यातील शौर्याचे दर्शन घडविले.
बंदिवासातही आपली मान उंच ठेऊन कोणतीही माहिती शत्रुला दिली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आंतरराष्टीय पातळीवर मुत्सदेगिरीचे दर्शन घडविले. अभिनंदन यांना सन्मानाने परत सोडणे पाकिस्तानला भाग पडले. त्यावेळी संपूर्ण देशाने त्यांचा गौरव केला होता.
अभिनंदनच्या युनिट 51 स्क्वॉड्रनला 27 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानी हवाई दलाचा हवाई हल्ला उधळून लावण्याच्या भूमिकेबद्दल युनिट प्रशस्तिपत्र देखील मिळाले. उ जैश-ए-मोहम्मदच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने हे हल्ले केले होते. आता अभिनंदन यांना ग्रुप कॅप्टन या पदावर बढती देण्यात आली आहे.
Balakot Air Strike’s Hero Wing Commander Abhinandan promoted to Group Captain
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान