हरियाणा आणि दिल्लीच्या विविध भागातून जंतरमंतरवर पोहोचले कुस्तीपटू
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती संघाबाबत सुरू असलेल्या वादात नवा ट्विस्ट आला आहे. शेकडो ज्युनियर कुस्तीपटूंना त्यांच्या करिअरची चिंता सतावू लागली आहे. यामुळेच त्यांच्या कारकिर्दीचे एक वर्ष उद्ध्वस्त झाल्यानंतर शेकडो ज्युनियर कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतरमंतरवर निदर्शने सुरू केली.Bajrang Sakshi and Vinesh are pitted against junior wrestlers
हरियाणा आणि दिल्लीच्या विविध भागातून बसने जंतरमंतरवर पोहोचलेल्या ज्युनियर कुस्तीपटूंनी या परिस्थितीसाठी वरिष्ठ कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांना जबाबदार धरले आहे. जंतर-मंतरवर पोहोचलेल्या कनिष्ठ पैलवानांची दिल्ली पोलिसांना कल्पना नव्हती.
जंतरमंतरवर निदर्शने करणाऱ्यांमध्ये बागपतच्या छपरौलीच्या आर्य समाज आखाड्यातून ३०० पैलवान आले आहेत. तर वीरेंद्र कुस्ती अकादमीतून शेकडोहून अधिक पैलवान नरेला येथे पोहोचले आहेत. दिल्ली-एनसीआरच्या वेगवेगळ्या आखाड्यांमधून निषेध करण्यासाठी आलेल्या ज्युनियर कुस्तीपटूंनी बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
Bajrang Sakshi and Vinesh are pitted against junior wrestlers
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले- भगवान श्रीराम शिकार करून मांस खात असत
- 1990 ची 2024 मध्ये रिपीट प्रयोगशाळा; सनातनला शिव्या घाला; स्वतःच्याच मतांना “खोडा” लावा!!
- महुआ मोईत्रा पुन्हा नव्या वादात अडकल्या, माजी प्रियकराची हेरगिरी केल्याचा आरोप
- कर्नाटकी कशिदा त्यांनी काढिला; काँग्रेसची बोट लागली बुडायला!!