वृत्तसंस्था
बेंगलुरु : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात काँग्रेसने बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आणि या बंदीचा मुद्दा कर्नाटक सह देशभर पेटला. काँग्रेसच्या निषेधार्थ कर्नाटकातल्या शेकडो मठ आणि मंदिरांमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांनी आज हनुमान चालीसाचे पठण केले. बजरंग दलावरील बंदीच्या विरोधाचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जय बजरंग बली या घोषणेतून तापविला आणि भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांना त्यातून ट्रिगर मिळाला.Bajrang Dal ban issue flares up against Congress in Karnataka; Hanuman Chalisa Pathan of lakhs of workers in thousands of math temples!!
त्याचवेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय कायदेमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते एम वीरप्पा मोईली यांनी बजरंग दलावरील कथित बंदी विरोधात काँग्रेस नेत्यांचे कान टोचले. आपण केंद्रात कायदेमंत्री होतो. त्यामुळे आपल्याला हे पक्के माहिती आहे, की राज्य सरकार अशी कोणतीही बंदी आणू शकत नाही. बजरंग दलावरच्या बंदीचा मुद्दा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कसा आला?, हे आता डी. के. शिवकुमारच सांगतील, असे वक्तव्य पत्रकार परिषदेत करून वीरप्पा मोईली यांनी काँग्रेस नेत्यांच्या अडचणीत वाढ केली.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या प्रचार सभांची सुरुवातच जय बजरंग बली या घोषणेने केल्याने भाजप, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना नवा हुरूप आला आणि त्याचाच परिणाम म्हणून आज संपूर्ण कर्नाटकातल्या हजारो मठ मंदिरांमध्ये लाखो कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसाचे पठण केले.
मल्लेश्वर मंदिरात केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्या शोभा करंदलजे यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसाचे पठण केले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील केवळ बंदीच्या उल्लेखाने बजरंग दल संघटनेला कर्नाटक सह संपूर्ण देशभर एकदम राजकीय संजीवनी मिळाली आहे.
Bajrang Dal ban issue flares up against Congress in Karnataka; Hanuman Chalisa Pathan of lakhs of workers in thousands of math temples!!
महत्वाच्या बातम्या
- कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष नाही!!; याचा अर्थ 2024 पर्यंत पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष??; बाकीच्या फॉर्म्युल्यात बाळासाहेबांची कॉपी??
- मी मुख्यमंत्री म्हणून काय केले हे जगजाहीर, प्रत्येकाला मी त्यांच्या कुटुंबातला सदस्य वाटतो; उद्धव ठाकरेंचे पवारांना प्रत्युत्तर
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत शरद पवारांचं मोठं विधान! कार्यकर्त्यांना म्हणाले ‘’दोन दिवसानंतर तुम्हाला…’’
- Colonial loot : ब्रिटीशांनी भारतातून ‘कोहिनूर’सह मौल्यवान रत्न कशी लुटली?