विशेष प्रतिनिधी
मुंबई: 100 कोटींच्या वसूली प्रकरणात तपास करणाऱ्या चांदीवाल समितीने परमबीर सिंग यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल हे या चौकशी समितीचे प्रमुख आहेत.Bail warrant issued against Parambir Singh, summons issued by Chandiwal Committee
आयोगाने वॉरंट जारी करण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी आयोगाने परमबीर सिंह यांच्यावर चौकशी समितीसमोर हजर न झाल्याचे आरोप केले आहेत. गेल्या महिन्यात गैरहजर राहिल्याने आयोगाने 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला होता. हे पैसे मुख्यमंत्री मदत निधीमध्ये जमा करण्यास सांगितले होते.
- परमबीर सिंग यांचा पाय आणखी खोलात, 2 कोटींच्या लाचखोरीप्रकरणी एसीबी चौकशीला ठाकरे-पवार सरकारची मंजुरी
समितीने परमबीर सिंह यांना एक नवीन समन्स पाठवले आहे. या समन्समध्ये येत्या 3 दिवसांत दंडाची रक्कम मुख्यमंत्री मदत निधीमध्ये जमा करण्यास सांगितली होते. त्याच्यासमोर हजर न झाल्यामुळे तपास थांबवला जाणार नाही असे चौकशी समितीने परमबीर सिंह यांना पाठवलेल्या ताज्या समन्समध्ये म्हटले होते. समितीने परमबीर सिंह यांना 25 ऑगस्ट रोजी त्यांच्यासमोर हजर राहण्यास सांगितले होते.
परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर परमबीर सिंह या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आधी सर्वोच्च न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
दरम्यान, राज्य सरकारने सदरील आरोपांची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी 30 मार्च रोजी एक सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. त्यानंतर 3 मे रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत राज्य सरकारने दिवाणी न्यायालयाचे अधिकार चौकशी समितीला दिले आहेत.
चांदीवाल समितीने यापूर्वी परमबीर सिंह यांच्यावर चौकशी समितीसमोर गैरहजर राहिल्याने 5 हजारांचा दंड ठोठावला होता. समितीने सिंह यांना वारंवार फोन करुनही गैरहजर राहिल्याने आता 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.
Bail warrant issued against Parambir Singh, summons issued by Chandiwal Committee
महत्त्वाच्या बातम्या
- दाभोलकर हत्या प्रकरणी आता 15 सप्टेंबरला दोषारोपपत्र, कोरोनामुळे न्यायालयाकडून आरोपींना मुदतवाढ
- उत्तर प्रदेशच्या निवडणुकांबद्दल ओवैसींचा मोठा दावा, म्हणाले – 100 जागा लढू आणि जिंकू, इतर पक्षांवर केली आगपाखड
- मायावतींच्या सभेत दिसले शंख, गणपती, त्रिशूल अन् जय श्रीराम; म्हणाल्या, दलितांवर पूर्ण विश्वास, प्रबुद्ध वर्गाच्या मदतीनेच पूर्ण बहुमताचे सरकार!
- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावाचे देशभर काँग्रेसकडून वेगळे आयोजन; केंद्र सरकारच्या कार्यक्रमांना “राजकीय काटशह”